• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

गरोदर होण्यासाठी मान्य केल्या विचित्र अटी, नंतर मुलगी झाल्यावर…, 35 वर्षांपूर्वीचा हा चित्रपट बघताना घाबरतात लोक

July 2, 2026 by admin Leave a Comment


बॉलिवूडमधील अनेक जुने कलाकार आजही आपल्या दमदार अभिनयामुळे आणि संस्मरणीय भूमिकांमुळे प्रेक्षकांच्या मनात कायमचे घर करून आहेत. विशेषतः खलनायकाच्या भूमिका साकारणाऱ्या कलाकारांपैकी अभिनेते रझा मुराद यांचे नाव आजही मोठ्या आदराने घेतले जाते. आपल्या भारदस्त आवाजामुळे, प्रभावी व्यक्तिमत्त्वामुळे आणि दमदार अभिनयामुळे त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत वेगळी ओळख निर्माण केली.

रझा मुराद सोशल मीडियावरही चांगलेच सक्रिय असून, ते वेळोवेळी त्यांच्या जुन्या चित्रपटांच्या आठवणी चाहत्यांसोबत शेअर करत असतात. नुकतेच त्यांनी 1990 साली प्रदर्शित झालेल्या गाजलेल्या हॉरर चित्रपट ‘बंद दरवाजा’ मधील एक खास प्रसंग सोशल मीडियावर पोस्ट केला. या पोस्टमुळे पुन्हा एकदा या चित्रपटाची चर्चा रंगू लागली आहे.

रझा मुराद यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर चित्रपटातील एक सीन शेअर करत त्या प्रसंगामागील आठवणींना उजाळा दिला. त्यांनी लिहिले की, ‘बंद दरवाजा’मधील या नाट्यमय सीनमध्ये मी एका दुष्ट पात्राची भूमिका साकारली होती. या प्रसंगात मी आणि अरुणा इराणी मिळून कुनिका सदानंदला आमच्या गटात सामील होण्यासाठी आणि तिच्यावर अन्याय करणाऱ्यांविरुद्ध सूड उगवण्यासाठी प्रवृत्त करण्याचा प्रयत्न करत होतो. त्यांच्या या पोस्टवर चाहत्यांनीही मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया देत त्या काळातील चित्रपटांची आठवण काढली.

चित्रपटाची कथा काय?

चित्रपटाची कथा त्या काळासाठी अत्यंत वेगळी आणि रहस्यमय होती. कथानक एका अशा विवाहित महिलेभोवती फिरते जी मातृत्वासाठी आतुर असते; मात्र तिला मूल होत नसल्याने ती मानसिकदृष्ट्या खचलेली असते. अशा परिस्थितीत तिची भेट एका गूढ आणि रहस्यमय व्यक्तीशी होते. तो तिला मूल होण्यासाठी मदत करण्याचे आश्वासन देतो, पण त्यासाठी एक विचित्र अट घालतो. जर मुलगा झाला तर तो तिच्याकडे राहील, पण मुलगी झाली तर ती त्याला द्यावी लागेल.

 

View this post on Instagram

 

A post shared by Raza Murad (@razamurad1950)

मातृत्वाच्या ओढीपोटी ती महिला ही अट मान्य करते. काही काळानंतर तिला मुलगी होते; मात्र जन्मानंतर तिचे त्या बाळावर प्रचंड प्रेम जडते आणि ती मुलगी त्या रहस्यमय व्यक्तीच्या स्वाधीन करण्यास स्पष्ट नकार देते. यानंतर सुरू होतो भीती, रहस्य आणि सूडाचा थरारक खेळ. कथेत पुढे अनेक धक्कादायक घटना घडतात आणि चित्रपट प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवतो.





Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • जुही चावलीची लेक जान्हवी मेहताचं हटके ट्रान्सफॉर्मेशन, चौथा फोटो पाहून म्हणाल…
  • ENGW vs SAW Semi Final Toss : दक्षिण आफ्रिकेचा बॉलिंगचा निर्णय, इंग्लंडला किती धावांवर रोखणार?
  • ENG vs IND : एक निश्चित वेळच नाही, इंग्लंड-इंडिया दुसरा सामना किती वाजता?
  • Aamir Khan Wedding: वयाच्या 61 व्या वर्षी आमिर खानची ‘लगीन घाई’, लग्न मंडपापासून गेस्ट लिस्टपर्यंत घ्या जाणून
  • हिंदू मंदिरांच्या पैशातून नाही बनणार मॉल आणि हॉल.. मुख्यमंत्री थलपती विजय यांचा मोठा निर्णय, थेट 46 प्रकल्प..

Recent Comments

No comments to show.

Archives

  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in