• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मोठी बातमी! उद्या उद्धव ठाकरे करणार सरकारला घाम फोडणारी घोषणा, पत्रकार परिषद बोलावली, राजकारणात वेगवान घडामोडी

July 2, 2026 by admin Leave a Comment


गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात मोठ्या घडामोडी घडताना दिसून येत आहे. शिवसेना ठाकरे गटात मोठी फूट पडली, सहा खासदारांनी पक्षातून बंडखोरी केली, त्यांनी शिवसेना ठाकरे गटात पक्षप्रवेश केला. हा उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.  दरम्यान पक्षात पडलेल्या फुटीनंतर आता शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे अ‍ॅक्शन मोडमध्ये आल्याचं पहायला मिळत आहे. ज्या -ज्या मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटात फुट पडली, त्या सर्व सहाही मतदारसंघात उद्धव ठाकरे यांनी नुकतीच सभा घेतली. या सभेच्या माध्यमातून त्यांनी बंडखोर खासदारांवर जोरदार हल्लाबोल केला.

दरम्यान त्यानंतर आता शुक्रवारी उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद बोलावली आहे. या पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरे हे मोठी घोषणा करणार आहेत.  राम मंदीरातील दान घोटाळ्यासंदर्भात शिवसेना ठाकरे गटाकडून राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा करण्यात येणार आहे.  उद्या उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेऊन आंदोलनाची घोषना करणार आहेत. या पार्श्वभूमीवर  राज्य भरातील राम मंदीर आणि हनुमान मंदीरात महाआरतीचे आयोजन ठाकरेंच्या शिवसेनेकडून करण्यात येणार आहे. दादर येथील हनुमान मंदिरात पहिल्या महाआरतीचे आयोजन करण्यात येणार आहे, दादर पश्चिम येथील हनुमान मंदीरात शिवसेना ठाकरे गटाकडून रामरक्षा महाआरतीचे आयोजन करण्यात येणार आहे. दरम्यान या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न ठाकरे गटाकडून होणार आहे. याबाबत खासदास संजय राऊत यांनी ट्विट करत माहिती दिली आहे.

शिवसेना ठाकरे गटात मोठी फूट पडली आहे, शिवसेना ठाकरे गटाला दोन मोठे धक्के बसला आहेत, एक म्हणजे सहा खासदारांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे, तर दुसार धक्का सचिन आहिर यांनी दिला आहे. त्यामुळे आता वरळी मतदारसंघात आदित्य ठाकरे यांच्या देखील अडचणी वाढण्याच्या शक्यता आहेत. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांची उद्याची पत्रकार परिषद महत्त्वाची असणार आहे. या पत्रकार परिषदेत  ठाकरे आंदोलनाची घोषणा करणार आहेत.

 



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मोदी सरकारचा शेतकऱ्यांना मोठा दिलासा; गव्हाच्या निर्यातीबाबत घेतला सर्वात महत्वाचा निर्णय
  • मित्र किंवा नातेवाईकाचा ‘लोन गॅरेंटर’ बनताय? आधी वाचा ‘हे’ नियम, नाहीतर बसेल मोठा आर्थिक फटका
  • तिरंग्याच्या रंगातील गाऊनने उर्वशी रौतेला ट्रोल; कायदा नेमका काय सांगतो?
  • रेल्वेतून ब्लँकेट्स, चादरी चोरली? मग दंडासह इतक्या वर्षांचा होणार तुरुंगवास
  • कचोरीत उंदराच्या लेंड्या ? छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूरमध्ये भवानी स्वीटवर FDAची कारवाई

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in