
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आर्य चाणक्य यांनी आपल्या या ग्रंथामध्ये अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजही अनेकांना जीवन कसं जगावं? याचं मार्गदर्शक करतात. चाणक्य म्हणतात आपल्या आयुष्यात असे काही प्रसंग येतात. जिथे माणसाने नेहमी गप्प बसावं. तुम्ही गप्प बसले याचा अर्थ तुम्हाला काही कळत नाही, असा होत नाही. तर मौन हे व्यक्ती विद्वान असल्याचं एक लक्षण आहे. जे लोक हुशार असतात, ते कुठेही गरज नसताना बोलत नाहीत. जेव्हा तुमची गरज नसताना तुम्ही बोलता, तेव्हा त्यामुळे तुम्ही अडचणीत सापडू शकता. समजातील तुमचा मान सन्मान कमी होतो. याउलट जिथे तुमची गरज आहे, तिथेच जर तुम्ही बोललात तर तुमची प्रतिष्ठा वाढते, समजात तुम्हाला सन्मान प्राप्त होतो. चला तर मग जाणून घेऊयात आर्य चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.
राजा समोर बोलू नका – चाणक्य म्हणतात जेव्हा राजा बोलत असतो, तेव्हा गप्प राहण्यातच शहाणपणा आहे. राजा भलेही चुकीचा असेल परंतु त्याला कधीही सल्ला देण्याच्या भाणगडीत पडू नका. कारण त्याला जर तुमचा राग आला तर तुमची गाठ थेट मृत्यूशी होऊ शकते, किंवा तुम्हाला इतरही भयंकर शिक्षा मिळू शकते, त्यामुळे राजाला कधीही सल्ला देऊ नका, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.
दोन भावामध्ये संपत्तीचं वाटप – जेव्हा दोन भावांमध्ये संपत्तीचं वाटप सुरू असतं, तेव्हा चुकूनही मध्ये पडू नका. वाटणी कशी करायची हे त्यांचं त्यांना ठरू द्या. जर तुमच्या बोलण्यामुळे एखाद्या भावाला संपत्ती जास्त आली आणि दुसऱ्याला कमी गेली तर त्याचं पाप आयुष्यभरासाठी तुम्हाला लागेल. तसेच अशा प्रसंगात तुम्ही बोललात तर समाजात तुमचे शत्रू देखील निर्माण होऊ शकतात. त्यामुळे अशा प्रसंगात कधीही बोलू नका, असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे.
मूर्ख लोकांना सल्ला देऊ नका – चाणक्य म्हणतात जेव्हा तुमची गाठ एखाद्या मूर्ख व्यक्तीशी पडते, तेव्हा अशा प्रसंगी तुम्ही शांत राहाणं हेच तुमच्या फायद्याचं आहे. कधीही मूर्ख लोकांना सल्ला देण्याच्या भानगडीत पडू नका, त्यामुळे तुम्हीच संकटात सापडाल.
भांडणावेळी शांत राहा – चाणक्य म्हणतात जेव्हा दोन व्यक्तीचे भांडणं सुरू असतात, तेव्हा अशावेळी कधीही मध्ये पडू नका असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
Leave a Reply