• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

हिंदू मंदिरांच्या पैशातून नाही बनणार मॉल आणि हॉल.. मुख्यमंत्री थलपती विजय यांचा मोठा निर्णय, थेट 46 प्रकल्प..

July 2, 2026 by admin Leave a Comment


तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत थलपती विजय यांच्या पक्षाने धमाका केला. अभिनेत्याने काही दिवसांपूर्वीच या पक्षाची स्थापन केली होती. विशेष म्हणजे लोकांनी थलपती विजय यांच्या पक्षाला इतके जास्त प्रेम दिले की, त्याला थेट सत्तेत बसवले. थलपती विजय यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. थलपती विजय यांच्याकडून मोठे निर्णय घेतली जात आहेत. विशेष म्हणजे थलपती विजय यांनी या निवडणुकीत अत्यंत साध्या साध्या लोकांना उमेदवारी दिली आणि त्यांना निवडून आणले. थलपती विजय यांची देशभरात मोठी क्रेझ बघायला मिळतंय. भल्या भल्या राजकारणांना जे जमले नाही ते थलपती विजय यांनी करून दाखवले. माजी मुख्यमंत्री विजय यांनी एम. के. स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखालील मागील द्रमुक सरकारने घेतलेला एक निर्णय थलपती विजय यांनी फिरवला आहे. मागील सरकारने मंदिरांच्या निधीतून 46 प्रकल्प राबवण्यास मंजुरी दिली होती.

मुख्यमंत्री थलपती विजय यांच्या नेतृत्वाखालील टीव्हीके सरकारने हे सर्व प्रकल्प रद्द केले आहेत. मंदिरांची सर्व जंगम व स्थावर मालमत्ता केवळ पवित्र कार्यांसाठीच वापरली जाईल, असे जाहीर केले आहे. हा एक अत्यंत मोठा निर्णय नक्कीच म्हणावा लागणार आहे. थेट यांनी हे सर्व प्रकल्प रद्द करण्याचा निर्णय घेतला. आता मंदिरांची मालमत्ता कुठेही जाणार नाही.

सरकारने हिंदू धार्मिक आणि धर्मादाय बंदोबस्त विभागाला या सुधारणा करण्याचे आदेश दिले. मागील सरकारने मंजूर केलेले 46 प्रकल्प रद्द करण्यात आलीत. या निर्णयाबद्दल मुख्यमंत्री विजय यांचे कौतुक केले जात आहे. मुख्यमंत्रिपदाची सुत्रे आपल्या हातात घेतल्यापासून थलपती विजय एका मागून एक मोठे निर्णय घेत आहेत.

डीएमके सरकारने मंदिराच्या निधीचा वापर करून 246 कोटी रुपये खर्चाच्या 29 विवाहमंडप आणि 17 व्यावसायिक संकुलांच्या बांधकामाला मंजुरी दिली होती. या आदेशात नमूद करण्यात आले आहे की, या 46 प्रकल्पांचे काम अद्याप सुरू झालेले नाही. हे आदेश रद्द करण्याचे आदेश विजय यांनी दिली. हा त्यांचा अत्यंत मोठा निर्णय म्हणावा लागणार आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Rupali Thombre Patil : ‘आम्ही शेंगा खाल्ल्या नाहीत, टरफलं उचलणार नाही’, चाकणकरांची बदनामी केल्याच्या आरोपावर ठोंबरेंची प्रतिक्रिया
  • पर्यटकांची पहिली पसंती! पश्चिम चंपारणच्या ‘या’ वन्यजीव स्थळाला रोज 1,000 सैलानींची भेट
  • Mumbai FDA : शिवाजी पार्कातील कॅफे कॅडेलचा अन्न परवाना रद्द; एफडीएकडून कारवाई
  • लॉन्च होताच ‘निसान’च्या ‘या’ नव्या एसयूव्हीचा धुमाकूळ; पहिल्याच महिन्यात क्रेटा आणि डस्टरचे टेन्शन वाढवले
  • PPF मध्ये 1000,5000 किंवा 10000 रुपये जमा केल्यावर किती परतावा मिळेल? कॅल्क्युलेशन जाणून घ्या

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in