• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

उन्हाळ्यातही मिळेल थंडावा,नॉर्थ ईस्टच्या या ७ सुंदर हील स्टेशनवर फिरुन या….

May 31, 2026 by admin Leave a Comment


उन्हाळ्यात लोक थंड आणि नैसर्गिक सुंदरता असलेल्या ठिकाणी फिरायला जाण्याच्या योजना आखतात. नॉर्थ – ईस्ट इंडियात म्हणजे पूर्वोत्तर भारतातील सुंदर हिल स्टेशन देखील एक शानदार पर्याय होऊ शकतो.देशात अनेक ठिकाणी जेव्हा प्रचंड उन्हाळा असतो. तेव्हा नॉर्थ – ईस्टच्या पवर्तमय प्रदेशातील हवामान थंड आणि आल्हाददायक असते. येथील सुंदर पर्वत, दऱ्या, सरोवरे आणि स्थानिक संस्कृती या सहलीला खास बनवतात. नॉर्थ ईस्टमधील थंड हवेची ठिकाणे तुमच्यासाठी खास होऊ शकतात.

१) मेघालयाचे शिलाँग

शिलाँगला ‘स्कॉटलँड ऑफ दि इस्ट’ देखील म्हटले जाते. येथील हवामान थंड, सुंदर धबधबे, झरे आणि हिरवळ लोकांना आकर्षित करते. या शहरातील संगीताची संस्कृती, कॅफे आणि शांत वातावरण लोकांना भुरळ घालते. हे उमियम लेक, एलिफंट फॉल्स आणि शिलाँग पिक हे फिरण्यासाठी पर्यटन स्थळे आहेत.

२) अरुणाचल प्रदेशातील तवांग

अरुणाचल प्रदेशातील तवांग हे बर्फाने झाकलेले पर्वत आणि सुंदर मठांसाठी प्रसिद्ध आहे. येथे उन्हाळ्यातील हवामान थंड आणि आल्हाददायक असते. येथील निसर्ग निसर्गप्रेमांना खुणावत असतो. ज्यांना शांतता आवडते त्यांच्यासाठी हे ठिकाण उत्तम आहे. येथील तवांग मठ, सेला पास आणि माधुरी लेक फिरण्यासाठी खास प्रसिद्ध आहेत.

३) सिक्कीमचे गंगटोक

गंगटोक हे आधुनिक सुविधा आणि नैसर्गिक सौदर्य यांचा सुंदर मिलाफ आहे. येथी स्वच्छ रस्ते, हिमालयातील सौदर्य आणि स्थानिक बाजार लोकांना खूप आवडतात. येथे तुम्ही छांगू लेक, एमजी मार्ग आणि नाथुला पास सारख्या ठिकाणी फिरू शकता.

४) पश्चिम बंगालचे दार्जिलिंग

दार्जिलिंग चहाचे मळे, टॉय ट्रेन आणि येथील थंड वातावरणासाठी जगभरात प्रसिद्ध आहेत. येथील सकाळचे धुके आणि पर्वताचे सौदर्य पर्यटकांना खुणावत असते. येथे टायगर हिल, बतासिया लूप आणि दार्जिलिंग हिमालयीन रेल्वेचा समावेश आहे.

५) आसामचे हाफलोंग

हाफलोंग आसामचे एकमेव हिल स्टेशन आहे. हे देखील जास्त गर्दी नसलेले सुंदर आणि शांत ठिकाण आहे. येथे तुम्ही शांततेचा अनोखा अनुभव घेऊ शकता. येथे तुम्ही हाफलोंग लेक, जटिंगा आणि मायबांग सारख्या ठिकाणी फिरु शकता.

६) अरुणाचल प्रदेशच झिरो (Ziro)

झिरो हे हिरव्यागार दऱ्या, भातशेती आणि अपातानी जमातीच्या संस्कृतीसाठी ओळखले जाते. येथील शांत आणि नैसर्गिक वातावरण पर्यटकांना आवडते. येथे झिरो व्हॅली, टॅली व्हॅली वाईल्डलाईफ सेंचुरी आणि अपातानी गाव हे स्पॉट प्रसिद्ध आहेत.

७) मिझोरमचे आयझोल

आयझोल एक शांत आणि सुंदर पर्वतांचे शहर आहे. येथे चारी बाजूंनी हिरवे डोंगर आणि थंडा हवा अनुभवता येते. गर्दीपासून हे ठिकाण दूर आहे. आरामदायक सुट्ट्या घालवण्यासाठी हे शहर प्रसिद्ध आहे. येथे फिरण्यासाठी डर्ट लँग हिल्स, मिझोरम स्टेट म्युझियम आणि रीएक पीक यांचा समावेश आहे.

 



Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • IMD Monsoon Update : पुढील 48 तास अत्यंत महत्त्वाचे; या जिल्ह्यांना पाऊस झोडपणार, हवामान विभागाकडून मोठा इशारा
  • 27 वर्षे जुन्या चित्रपटाचा ओटीटीवर धुमाकूळ; ट्रेडिंगमध्ये टॉपर बनलाय ब्लॉकबस्टर
  • विना तिकीट प्रवास आता महागणार, रेल्वेकडून फुकट्या प्रवाशांसाठी आता आणखी कठोर तरतूद
  • PF नॉमिनेशन केले नाहीये? खातेधारकाच्या मृत्यूनंतर क्लेम कसा आणि कोणाला मिळतो? पाहा सविस्तर कायदेशीर प्रक्रिया
  • बँकेपेक्षा जास्त कमाई! जून 2026 मध्ये NBFC FD मध्ये गुंतवणुकीची सुवर्णसंधी, पाहा लेटेस्ट व्याजदरांची यादी

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in