• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

इस्त्रायली सैन्य टप्याटप्याने…. डोनाल्ड ट्रम्प यांचा युद्धाबाबत मोठा दावा, पडद्यामागे नेमकं काय घडतंय?

July 31, 2026 by admin Leave a Comment


अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझा युद्धाबाबत मोठा दावा केला आहे. ‘बोर्ड ऑफ पीस’च्या मध्यस्थीने हामास आणि गाझामधील सर्व सशस्त्र संघटनांमध्ये ऐतिहासिक करार झाल्याचा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. या करारानुसार अंमलबाजवीनंतर इस्त्रायली सैन्य टप्प्याटप्प्याने गाझामधून माघार घेईल, असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानाची जगभर चर्चा होत आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटलं की, हमास आणि इतर संघटनांचं नि:शस्त्रीकरण पूर्ण झाल्यानंतर इस्त्रायली सैन्य गाझामधून माघार घेईल. आंतरराष्ट्रीय स्टेबलायजेशन फोर्स आणि नवीन पॅलेस्टिनी पोलीस संयुक्तपणे गाझाच्या सुरक्षेची जबाबदारी स्वीकारतील. यामुळे इस्त्रायलला सुरक्षा मिळेल’. डोनाल्ड ट्रम्प यांनी पुढे सांगितलं की, ‘गाझामध्ये एक नवीन पॅलेस्टिनी सरकार स्थापन होईल. नवं शासन हे नागरिकांच्या आयुष्यात सुधारणा आणण्यासाठी काम करेल. तसेच ’20-पॉइंट प्लानचा उद्देश हा गाझातील संघर्ष समाप्त करून कायमस्वरुपी शांतता प्रस्थापित करणे आहे’.

 

🚨 HUGE & HISTORIC: President Trump announces complete disarmament of Hamas and all armed groups in Gaza. A major breakthrough for lasting peace and security! Something many said could never be achieved!

“Today, the Board of Peace reached a HISTORIC agreement for the COMPLETE… pic.twitter.com/EgJodU5TQh

— Commentary Donald J. Trump Posts From Truth Social (@TrumpDailyPosts) July 30, 2026

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी करारासाठी इजिप्त, कतार आणि तुर्की या देशांनी केलेल्या मध्यस्थीचं कौतुक केलं. ट्रम्प यांच्या घोषणेवर हमासकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. दुसरीकडे गाझामध्ये हिंसाचार सुरूच आहे. इस्त्रायलच्या एअर स्ट्राईक हल्ल्यात दोन मुलांसह सहा जणांचा मृत्यू झाला, अशी माहिती पॅलेस्टिनी आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली.

व्हाइट हाऊसने ‘एक्स’वर पोस्ट करत म्हटलं की, ‘बोर्ड ऑफ पीस’ने गाझाने हमास आणि इतर सर्व सशस्त्र गटांचं नि:शस्त्रीकरण करण्याबाबत ऐतिहासिक करार केला. खरंतर व्हाइट हाऊसने चिरस्थायी शांतता आणि सुरक्षेच्या दिशेने मोठं आणि महत्त्वाचं पाऊल टाकल्याचे म्हटलं आहे. तत्पूर्वी, ‘बोर्ड ऑप पीस’ ही एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे. गाझा युद्धानंतर प्रशासन आणि सुरक्षेवर देखरेख ठेवण्यासाठी या संस्थेची स्थापना करण्यात आलं आहे. तर या संस्थेचे ट्रम्प हे संस्थापक अध्यक्ष आहेत. नव्याने करण्यात आलेल्या करारानुसार गाझामध्ये एक नवीन शासन व्यवस्थेची स्थापना करण्यात येईल. तसेच अनेक हल्ले रोखण्यासाठी हा करार करण्यात आला आहे.





Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • रॉयल एनफील्डचा धमाका! आयकॉनिक Continental GT 650 नवीन फीचर्ससह लाँच; जाणून घ्या किंमत
  • पाय बांधले, डोक्यावर वार.. NEET विद्यार्थिनीच्या हत्येने शहर हादरलं; पोस्टमॉर्टम रिपोर्टने उडवली खळबळ
  • आता इराणला हरवणे अशक्य ? अमेरिकेशी युद्ध सुरु असताना इराणला गवसला मोठा खजाना…
  • मोठा दणका! मुंबईत मंत्र्यांच्या फ्लॅटवर थेट कारवाई, उच्चभ्रू टॉवरमधील 128 फ्लॅटवर हतोडा?
  • भाजपच्या सर्वात ताकदवर संसदीय समितीत फडणवीसांची एंट्री? दिल्ली वाऱ्या वाढल्या

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in