• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

इराणने जगाची झोप उडवली, …तर उडणार हाहाकार, मध्यपूर्वेतून सर्वात मोठी बातमी

April 23, 2026 by admin Leave a Comment


अमेरिका आणि इराणमध्ये दोन आठवड्यांचा युद्धविराम झाला होता. त्याची मुदत संपल्यानंतर पुन्हा एकदा अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धविरामाचा कालावधी वाढवण्यात आल्याची घोषणा केली. मात्र जरी अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम आणखी वाढला असला तरी देखील स्ट्रेट ऑफ होर्मूजवर अजूनही प्रचंड तणाव असल्याचं पहायला मिळत आहे. युद्धविरामाची घोषणा झाल्यानंतर अमेरिका आणि इराण यांच्यामधील चर्चेची पहिली फेरी पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्ये पार पडली होती. मात्र या चर्चेमध्ये कोणताही ठोस तोडगा निघू शकला नव्हता. दरम्यान शुक्रवारपासून पुन्हा एकदा इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चेची दुसरी फेरी पाकिस्तानात होण्याची शक्यता आहे. परंतु त्यापूर्वी इराणने डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा झटका दिला आहे. डोनाल्ड ट्रम्प हे इराणसोबत चर्चेसाठी आपलं शिष्टमंडळ अमेरिकेत पाठवण्यास उत्सुक आहेत, मात्र दुसरीकडे इराणने याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतला नसल्याचं समोर आलं आहे.

याबाबत बोलताना इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता इस्माइल बकई यांनी सांगितलं की, आम्ही पूर्णपणे गांभीर्याने चर्चा सुरू केली होती. मात्र अमेरिकेनं आमच्याकडे दुर्लक्ष केलं. अमेरिकेनं चर्चेचं गांभीर्य समजलं नाही. त्यांनी आमची फसवणूक केली. अमेरिकेकडून वारंवार युद्धविरामाचं उल्लंघन करण्यात आलं. या सर्व गोष्टी लक्षात घेता अमेरिकेसोबत चर्चा करायची की नाही? याबाबत आम्ही अजून कोणताही निर्णय घेतला नसल्याचं बकई यांनी म्हटलं आहे. दरम्यान इराणने घेतलेल्या या भूमिकेमुळे आता जगाची चिंता वाढली आहे.

सध्या स्ट्रेट ऑफ होर्मूजमध्ये मोठा तणाव पाहायला मिळत आहे. एकीकडे इराणने हा रस्ता व्यापारी जहाजांसाठी बंद केला आहे, तर दुसरीकडे अमेरिकेने देखील या मार्गावर नाकेबंदी लावली आहे, त्यामुळे कच्च्या तेलाची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. जगाला जेवढ्या कच्च्या तेलाची गरज आहे, त्यातील सुमारे 25 टक्के कच्च्या तेलाची याच मार्गाने वाहतूक होते. युद्धकाळापासून स्ट्रेट ऑफ होर्मूज बंद असल्यानं याचा मोठा फटका हा भारताला देखील बसल्याचं दिसून येत आहे. या मार्गाने होणाऱ्या कच्च्या तेलाच्या पुरवठ्यात तब्बल 61 टक्के कपात झाली आहे. दरम्यान जर अमेरिका आणि इराणमध्ये कोणताही तोडगा निघू शकला नाही, आणि स्ट्रेट ऑफ होर्मूजमधील नाकेबंदी कायम राहिली तर जगावर फार मोठं ऊर्जा संकट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता संपूर्ण जगाचं लक्ष हे अमेरिका आणि इराणच्या चर्चेकडे लागलं आहे.

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Sanjay Raut : म्हणून सुनेत्रा पवारांना क्लीनचिट मिळाली? संजय राऊत यांचा दावा काय? सरकारवर जोरदार निशाणा
  • जगातील एकाही देशाला जे जमले नाही ते भारताने करून दाखवले, थेट शोधले ऊर्जेचे ब्रह्मास्त्र, LPG चे नो टेन्शन…
  • परत जा, तिथे कमवा अन् खा..; मराठी सक्तीविरोधात रिक्षाचालकांच्या संपावरून हेमंत ढोमेनं सुनावलं
  • NO PUC, NO Fuel; पेट्रोल-डिझेल सोडा CNG पण नाही मिळणार, त्या निर्णयाने नागरिकांना मोठी धडकी
  • Rohit Pawar | पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार, रोहित पवारांनी थेट नावच घेतलं; राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडणार?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in