• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

आमिर खान आणि गौरी स्प्रॅट अडकले विवाहबंधनात; सोहळ्याचा Video आला समोर

July 5, 2026 by admin Leave a Comment


बॉलिवूड अभिनेता आमिर खान आणि गौरी स्प्रॅट अखेर विवाहबंधनात अडकले आहेत. दोघांनी 5 जुलै रोजी मुंबईतील पाली हिल येथील आमिर खान यांच्या निवासस्थानी अत्यंत साध्या आणि कौटुंबिक वातावरणात विवाह केला. या विवाहाची नोंद स्पेशल मॅरेज ॲक्ट अंतर्गत करण्यात आली. या सोहळ्याला केवळ कुटुंबीय आणि अत्यंत जवळचे मित्र उपस्थित होते.

आमिर खानने काही दिवसांपूर्वीच आपल्या विवाहाविषयी माहिती देताना, मोठा समारंभ न करता घरच्या घरीच नोंदणीकृत विवाह करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले होते. त्यानुसार पाली हिल येथील त्यांच्या निवासस्थानाची आकर्षक रोषणाई करण्यात आली होती आणि विवाहासाठी आवश्यक तयारीही पूर्ण करण्यात आली होती.

कुटुंबीयांची उपस्थिती

या खास प्रसंगी आमिर खानची मुलगी आयरा खान तिच्या पतीसह उपस्थित होती. तसेच मुलगा जुनैद खानदेखील वडिलांच्या या आनंदाच्या क्षणाचा साक्षीदार बनला. याशिवाय आमिर खानच्या बहिणीसह इतर जवळचे नातेवाईकही विवाह सोहळ्यात सहभागी झाले.

100 ते 150 मान्यवरांची उपस्थिती

विवाह सोहळ्यासाठी सुमारे 100 ते 150 निवडक पाहुण्यांना निमंत्रित करण्यात आले होते. समारंभ अतिशय मर्यादित स्वरूपाचा असला तरी अनेक नामवंत व्यक्तींनी उपस्थित राहून नवदांपत्याला शुभेच्छा दिल्या.

अशातच मुंबईत मुसळधार पाऊस आणि रेड अलर्टची परिस्थिती असतानाही विवाहाच्या तयारीत कोणताही अडथळा आला नाही. विवाहाच्या आदल्या दिवशी घराबाहेर फर्निचर आणि खुर्च्या आणणाऱ्या कर्मचाऱ्यांचे फोटोही समोर आले होते. खराब हवामान असूनही सर्व व्यवस्था सुरळीतपणे करण्यात आली.

आमिर खानचा तिसरा विवाह

गौरी स्प्रॅट यांच्याशी झालेला हा आमिर खानचा तिसरा विवाह आहे. यापूर्वी त्याने 1986 मध्ये रीना दत्ता यांच्याशी विवाह केला होता. या दाम्पत्याला जुनैद आणि आयरा ही दोन मुले आहेत. मात्र सुमारे 16 वर्षांच्या संसारानंतर 2002 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला.

त्यानंतर लगान चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान आमिर यांची ओळख किरण राव यांच्याशी झाली. दोघांनी 2005 मध्ये विवाह केला आणि त्यांना आझाद हा मुलगा झाला. मात्र 2021 मध्ये आमिर आणि किरण यांनी परस्पर संमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला.

विशेष म्हणजे, घटस्फोटानंतरही आमिर खानचे रीना दत्ता आणि किरण राव या दोन्ही माजी पत्नींसोबत मैत्रीपूर्ण आणि आदरयुक्त संबंध कायम आहेत. अनेक सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये ते एकत्र दिसतात.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • नाशिकच्या कुंभमेळ्याच्या खर्चातील 0.1 टक्के…; संजय राऊतांकडून न्यायमूर्ती वराळेंचं कौतुक, पण मनातलंही बोलूनही दाखवलं
  • Bigg Boss फेम भजन सम्राट वयाच्या 73 व्या वर्षी उरकणार चौथं लग्न? म्हणाले, ‘3 लग्न करण्यास मनाई नाही, पण बायका ठेवण्यास…’,
  • चपाती लगेच कडक होते? फुगत नाही? कणिक मळताना करताय या चुका
  • ‘अभिनेता सिद्धार्थ जाधवची मृत्यूशी झुजं…’, भडकला अभिनेता, पोस्ट करत म्हणाला, ‘घाई तरी कसली…’
  • Marathi Language Row : रिक्षावाल्यांची इतकी मुजोरी, मुंबईत अचानक ऑटो-टॅक्सीचा इतका शॉर्टेज कसा झाला? कारण आलं समोर

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in