
पोलीस काका मला मारु नका… मीही उद्या भारताचा पंतप्रधान होऊ शकते. माझं वय फक्त कमी आहे. पण माझी शैक्षणिक पात्रता तीच आहे जी भारताचा पंतप्रधान होण्यासाठी लागले… असा एक पोस्टर घेऊन चिमुकली मोर्च्यात उपस्थित राहिली…
तर चुमिकलीच्या वडिलांनी देखील ठाकरेंवर विश्वास आहे… असं दाखवत एक पोस्ट पोस्ट घेऊन आले,'माझी मुलगी मला बोलली', 'पप्पा, मोर्चा मध्ये आपल्याला दिल्ली सारखं मारतील', मी तिली बोललो, नाही मारणार कारण मोर्चाचं नेतृत्व ठाकरे करत आहेत…
तर धर्मेंद्र प्रधान यांचा देखील यावेळी निषेध करण्यात आला. विद्यार्थी पोस्टरच्या माध्यमातून म्हणतात, 'Since Edu Minster has resigned आता NEET मारूया!' पोस्ट सध्या व्हायरल होत आहे.
दिशा स्टुडेंट संस्थेने देखील एक पोस्टर याठिकाणी जारी केला, 'दम है कितना दमन में तेरे, देख लिया है देखेंगे!', सध्या हे पोस्टर सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल होत आहेत.
आंदोलनानंतर धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला. यावर देखील देखील विद्यार्थ्यांनी पोस्टर जारी केलेत. 'आज धर्मेंद्र, उद्या देवेंद्र, परवा नरेंद्र…', हा पोस्टर सध्या सर्वांचं सक्ष वेधून घेत आहे.




Leave a Reply