• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

अल्पवयीन भाच्यापासून काकी गर्भवती राहिली, मग लाज सोडून सगळ्या गावासमोरच सांगितली नको ती इच्छा, हट्टालाच पेटली

June 24, 2026 by admin Leave a Comment


आपण समाजात राहतो. नैतिकतेच्या दृष्टीने काही मर्यादा पाळणं गरजेच आहे. कारण एक चुकीचं पाऊल सगळ्या कुटुंबाची घडी विस्कटवण्यासाठी पुरेसं असतं. त्या शिवाय समाजात इतरांसमोर आपण काय आदर्श निर्माण करतो हे सुद्धा तितकचं महत्वाचं आहे. उत्तर प्रदेशच्या अलीगढमध्ये एक हादरवून सोडणारं धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. नात्याला कलंकित करणारी ही घटना इगलास कोतवाली क्षेत्रातील एका गावची आहे. दोन मुलांची आई, वय वर्ष 40 शेजारी राहणारा एक अल्पवयीन मुलगा तिच्या नजरेत भरला. हा मुलगा नात्यात या महिलेचा भाचा लागायचा. या महिलेने वासनेच्या आहारी जाऊन तब्बल अडीच वर्ष या अल्पवयीन भाच्याचं शारीरिक शोषण केलं. हद्द तेव्हा झाली, जेव्हा महिलेने गावच्या पंचायतीसमोर अल्पवयीन भाच्यापासून गर्भवती असल्याच सांगितलं. मुलाच्या आईच्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपी महिलेला अटक करुन तुरुंगात टाकलं आहे.

पीडित मुलाने सांगितलं की, काकीने मागच्या अडीच वर्षांपासून मला घाबरवून, धमकावून माझ्याशी जबरदस्त शारीरिक संबंध ठेवले. ती सतत धमकावायची की, ऐकला नाहीस तर बलात्काराची खोटी तक्रार दाखल करेन. लोकलाजेस्तव आणि तुरुंगात जाण्याच्या भितीपोटी अल्पवयीन भाचा हे सर्व सहन करत होता. पण जेव्हा महिलेने कायम सोबत राहण्यासाठी लग्नाचा दबाव टाकायला सुरुवात केली, त्यावेळी पाणी डोक्यावरुन गेलं. घाबरलेल्या युवकाने लगेच घरी जाऊन आपल्या आईला हा सर्व प्रकार सांगितला. ते ऐकल्यानंतर कुटुंबाच्या पायाखालची जमीनच सरकली.

एवढं सर्व घडल्यानंतरही नवरा तिला सोबत ठेवायला तयार होता

विषयाचं गांभीर्य आणि कुटुंबाची प्रतिष्ठा लक्षात घेऊन इंस्पेक्टर डीके सिसौदिया यांच्या उपस्थितीत गावची पंचायत बोलवण्यात आली. पंचायतीत महिलेला पती आणि सासरची मंडळी तिला समाजवण्याचा प्रयत्न करत होते. एवढं सर्व घडल्यानंतरही नवरा तिला सोबत ठेवायला तयार होता. पण दोन मुलांची आई असलेली महिला काहीही ऐकायला तयार नव्हती. अल्पवयीन भाच्यासोबतच मी राहणार यावर ती महिला अडून बसली. तिने पंचायतीसमोर कबूल केलं की, भाच्यासोबतच्या संबंधांमुळे ती अडीच महिन्यांची गर्भवती आहे. नवऱ्याला सोडून भाच्यासोबत संसार थाटणार यावर ती अडून बसलेली. पंचायतीने समजावूनही काही फरक पडला नाही. परिस्थिती हाताबाहेर गेली, तेव्हा पोलिसांनी गुन्हा नोंदवून महिलेला अटक केली.

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Kriti Sanon : फिल्मी पडद्यावरच नाही, कमाईतही ‘हिट’; क्रिती सेननची कमाई नेमकी किती? संपत्तीचा आकडा थक्क करणारा
  • सून बायसेक्शुअल असल्याचं कळल्यावर गौरव खन्नाच्या आई-वडिलांनी काय केलं? आकांक्षा चमोला म्हणाली…
  • रूपाली चाकणकरांच्या रेस्टॉरंटमध्ये डान्सबार, हुक्का पार्लर… रुपाली ठोंबरेंचे खळबळजनक आरोप
  • 33 वर्षानंतर श्रीलंकन खेळाडूचं नशिब निघालं फुटकं, कोलंबोत एकदा नाही तर दोनदा पायावर मारली कुऱ्हाड
  • CJP च्या बड्या नेत्यावर अचानक हल्ला, त्या मुक्या प्राण्यामुळे एकच खळबळ, घडलं तरी काय?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in