• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

अर्शदीप सिंग अन् प्रेयसी समरीनचं एकमेकांना रोमँटिक गिफ्ट; अफगाणिस्तानविरुद्ध मैदानात उतरण्यापूर्वी ‘लव्हबर्डस’नी केलं तरी काय?

September 6, 2026 by admin Leave a Comment


भारत विरुद्ध अफगाणिस्तान तीन सामन्यांची टी20 मालिका 13 सप्टेंबर पासून सुरू होणार आहे. ही मालिका दिल्लीमध्ये खेळवली जाणार आहे. दरम्यान या सीरिजआधी भारताचा वेगवान डावखुरा गोलंदाज अर्शदीप सिंग चर्चेत आला आहे.

तर त्याचे झाले असे की, अर्शदीप आणि त्याची प्रेयसी समरीन कौर यांनी अतिशय रोमँटिक टॅटू गोंदून घेतले आहेत. त्यांचे हे टॅटू काही साधेसुधे नाहीत. त्यांच्या या टॅटूंची खासियत सांगायची झाली तर अर्शदीपच्या हातावर गोंदवलेला टॅटू हा त्याची प्रेयसी समरीनच्या हस्ताक्षरातला (SK) टॅटू आहे. त्याचप्रमाणे समरीनच्या हातावर गोंदवलेला टॅटू हा अर्शदीपच्या हस्ताक्षराचा टॅटू (AS) आहे. या टॅटूंसोबत छोटासा हर्टशेप देखील त्यांनी गोंदला आहे. त्यामुळे या लव्ह बर्ड्सच्या या टॅटूंची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by PTC Punjabi (@ptcpunjabi)

दुसरीकडे सध्या अर्शदीप हा शेरे पंजाब लीगमधील लुधियाना लायन्स या संघाचा कर्णधार म्हणून काम करत आहे. या लीगमध्ये आत्तापर्यंत त्याने एक सामना खेळला असून 2 विकेट्स घेतले आहेत, यामध्ये त्याने 31 धावा दिल्या. पण त्याचवेळी जालंधर वॉरियर्सकडून त्याचा संघ पराभूत देखील झाला आहे. सध्या त्याची टीम दोन विजयांसह गुणतालिकेमध्ये तिसऱ्या स्थानी पोहोचली आहे.

दरम्यान, आजही त्याच्या संघाचा पुढील सामना होणार आहे. हा सामना फाजील्का फाल्कन्स या टीमविरुद्ध खेळणार आहे. दरम्यान याच सामन्यामध्ये भारतीय संघाचा कर्णधार शुभमन गिलही त्याचे हंगामातील पदार्पण करणार असल्याची शक्यता आहे.

दरम्यान, अर्शदीप हा भारताचा एक प्रभावी कामगिरी करणारा गोलंदाज आहे. आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यांमध्ये भारतासाठी त्याने सर्वाधिक विकेट घेतले आहेत. त्याने 91 सामन्यांमध्ये 20.11च्या सरासरीने आणि 14.09 च्या स्ट्राइक रेटने आणि 8.56च्या इकॉनॉमी रेटने 135 विकेट घेतले आहेत. अर्शदीप हा 2024 आणि 2026 टी20 वर्ल्डकपच्या संघाचाही भाग राहिला आहे.

आता अर्शदीप अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेत पुन्हा एकदा खेळताना दिसणार आहे. हे सामने 13,15 आणि 17 सप्टेंबर रोजी खेळवले जाणार आहेत. हे सर्व सामने दिल्लीतल्या अरुण जेटली मैदानावर होणार आहेत.





Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मोठी बातमी! भाजपमधील अंतर्गतवाद चव्हाट्यावर? गिरीश महाजन येताच मंत्र्याचं बैठकीतून वॉक आऊट
  • आधीच 3 वादळांचं संकट! आता चौथ्या महासंकटाची चाहूल, प्रशांत महासागरात भयंकर, भारतासाठी काय धोका?
  • मी गारच पडले होते.., इंटिमेट सीनबद्दल अक्षया गुरवचा मोठा खुलासा; आईने दिली अशी परवानगी
  • Video: प्रसिद्ध अभिनेत्रीला नको तिथं स्पर्श, ती घटना घडताच संतापली, सर्व प्रसंग कॅमेऱ्यात कैद
  • 4 ठिकाणी अगरबत्ती चुकूनही पेटवू नका, अन्यथा…जाणून घ्या धोके

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in