• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

अमेरिकेतून भारत गाठला, पहिले आंदोलन फ्लॉप, 37 दिवसात पालटला गेम, जाणून घ्या अभिजीत दिपकेबद्दल सर्वकाही..

July 26, 2026 by admin Leave a Comment


नीट पेपरफुटीच्या मुद्द्यात मोठे आंदोलन जंतर मंतरवर सुरू होते. कॉकरोच जनता पार्टीकडून हे आंदोलन सुरू होते. काही मागण्या त्यांनी सरकारपुढे ठेवल्या. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाल्याशिवाय कोणत्याही परिस्थितीमध्ये मागे हटवणार नसल्याचे त्यांनी म्हटले. 20 जुलैला संसदेवर मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर आंदोलन चिघळले. आंदोलन आक्रमक झाले. हे आंदोलन फक्त दिल्ली आणि जंतर मंतर मैदानापुरतेच मर्यादित राहिले नाही, देशभरात विद्यार्थी रस्त्यावर उतरले. कॉकरोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजीत दिपके हे स्वत: जंतर मंतरवर ठाम मांडून होते. जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा नाही तोपर्यंत कोणत्याही परिस्थितीमध्ये जंतर मंतर सोडणार नसल्याची भूमिका त्यांची होती. 30 वर्षाचा अभिजीत दिपके अमेरिकेत राहत होता. फक्त आपल्या इच्छाशक्तीवर अवघ्या काही दिवसात त्याने सर्व युवकांना आकर्षित केले.

थेट काही महिन्यापूर्वी स्थापन केलेल्या एका पक्षाने एका केंद्रीय मंत्र्याचा राजीनामा घेतला. दिल्ली विमानतळावर उतरल्यानंतर अभिजीत दिपकेच्या हातात संविधानाची प्रत होती. एक्सवर पोस्ट शेअर करत अभिजीत दिपके याने आपण दिल्लीला उतरल्याचेही म्हटले होते. 6 जूनचे शक्तीप्रदर्शन पूर्णपणे अपयशी ठरले. जंतर मंतरवर मस्त भाष केले आणि केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली. त्यानंतर तब्येत खराब झाली आणि गर्दीही अत्यंत कमी असल्याने आपले आंदोलन गुंडाळण्याची वेळ दिपकेवर आली.

त्यावेळी कॉकरोच जनता पार्टीची हवा दिसली नाही. त्यानंतर पुन्हा 20 जूनला नवीन जोशमध्ये आंदोलनाला सुरूवात झाली. सोनम वांगचुक त्यांच्यासोबत जोडले गेले. वांगचुक यांच्या उपोषणामुळे या आंदोलनाला मोठी ताकद मिळाली. 19 जुलैला वांगचुक यांची तब्येत बिघडल्याने त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले. यादरम्यान संसदेत पावसाळी अधिवेशनाला सुरूवात झाल्यानंतर मोठा मोर्चा अभिजीत दिपके यांनी थेट संसदेवर काढला.

त्यात विद्यार्थ्यांचा मोठा आक्रोश बघायला मिळाला. या आंदोलनाला हिंसक वळण लागले. देशातील विविध भागातून विद्यार्थी या आंदोलनात सहभागी झाले. ऑनलाईन आणि ऑफलाईन हे आंदोलन सुरू होते. केंद्रीय मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांना सरकारकडून बोलण्यास पाठवण्यात आले. कॉकरोच जनता पार्टीचे शिष्टमंडळासोबत यांनी चर्चा केली.

सरकारवरील दबाब इतका वाढला की, अखेर त्यांना धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनाम घ्यावा लागला. अमेरिकेतून भारतात आलेला अभिजीत दिपके याने 37 दिवसात भारतीय राजकारणात वेगळी ओळख मिळवली. थेट केंद्रीय मंत्र्याचा राजीनामा घेतला. 9 जुलैला पहिले आंदोलन फ्लॉप झाले. 25 जुलैला मोठा विजय झाला. ज्याची कल्पना कोणीही केली नसावी, असा विजय झाला.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • बॉयफ्रेंडचा कोयत्याने हल्ला, बड्या सरकारी महिला अधिकाऱ्याचा मृत्यू, महाराष्ट्रातील धक्कादायक घटना
  • Snake : साप पुन्हा आयुष्यात तुमच्या घराकडे फिरकणार नाही, आदिवासी लोकांची ही खास ट्रीक प्रत्येकाला माहिती हवीच
  • Todays Gold Rate: आनंदाची बातमी! सोन्याचे भाव घसरला, आज 10 ग्रॅमसाठी…
  • प्रवाशांचा जीव धोक्यात! कसारा घाटात भरधाव एसटी बसचा चालक मोबाईलवर व्यस्त
  • लग्नानंतर नवऱ्याने सासरी राहायचं, भन्नाट रोमँटिक कॉमेडी सिनेमा; ओटीटीवर नंबर 1 वर होतोय ट्रेंड

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in