• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

अमित शाहांपाठोपाठ अजित डोभाल यांचा Gen-Z ला संदेश काय? म्हणाले, स्वातंत्र्याचा अर्थ…

August 1, 2026 by admin Leave a Comment


जंतरमंतरवर झालेल्या आंदोलनानंतर देशातील Gen-Z प्रकाशात आले आहेत. तरुणांच्या आंदोलनाने देशात खळबळ उडवून दिली आहे. त्यामुळे या तरुणांचं कौतुकही होत आहे आणि त्यांच्यावर टीकाही केली जात आहे. देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनीही या Gen-Zला संदेश दिला आहे. स्वातंत्र्याचा अर्थ स्वैराचार नाहीये, असा सल्लाच अजित डोभाल यांनी दिला आहे. पुणे येथील कार्यक्रमात डोभाल बोलत होते.

पुण्यात आज अजित डोभाल यांचा लोकमान्य टिळक पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. देशाचे गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते त्यांना गौरवण्यात आलं. यावेळी डोभाल यांनी पुण्याशी संबंधित आठवणींना उजाळा दिला. हा उजाळा देत असतानाच त्यांनी जंतरमंतरवरील आंदोलनाचा उल्लेख न करता तरुणांना संदेश दिला आहे.

आपलं सौभाग्य की…

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या सारखं मजबूत नेतृत्व आपल्याला मिळालं हे आपलं सौभाग्य आहे. भारत यावेळी अंतर्गत आणि बाह्य अशा दोन्ही समस्यांचा सामना करत आहे. देश वेगाने पुढे जात आहे. त्यामुळे विरोधी शक्ती देशाच्या प्रगतीमुळे त्रस्त आहेत. अशावेळी देशातील नागरिकांनी सर्वात आधी देशाच्या हिताबाबत विचार केला पाहिजे, असं अजित डोभाल यांनी म्हटलं आहे.

मनमानी करू नका

आजच्या तरुणांना स्वातंत्र्याचा खरा अर्थ कळला पाहिजे. काही लोकांना स्वातंत्र्याचा अर्थ मनमानी वाटतो. किंवा काहीही करणं वाटतं. असा विचार करणं हे अत्यंत चुकीचं आहे, असं सांगतानाच जो मार्ग देशाच्या विरोधात जातो, त्या मार्गाने जाऊच नव्हे. भारताला शक्तीशाली बनवणं हेच आपलं ध्येय आणि कर्तव्य असलं पाहिजे, असं त्यांनी म्हटलंय.

राष्ट्रभाव जागला पाहिजे

आजच्या युवकांनी विचार करण्याची गरज आहे, लोकमान्य टिळकांची राष्ट्रनिर्माणाची काय संकल्पना होती आणि त्यासाठी त्यांनी काय केलं हे जाणून घेतलं पाहिजे. आज टिळक असते तर भारताला सशक्त आणि विकसित बनवणं हाच माझा जन्मसिद्ध हक्क आहे, असे टिळक म्हटले असते, एवढं स्वतंत्र्य मिळवले आहे. राष्ट्रभाव जागला पाहिजे, असं ते म्हणाले.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुकाराम मुंढेंच्या रडारवर राज्यातील अंगणवाड्या, थेट आदेशाने टेन्शन वाढलं; या गोष्टींची तपासणी होणार!
  • Sharddha Kapoor : रस्त्यावर शॉपिंग, बिनधास्त हादडलं, श्रद्धा कपूर मुंबईच्या गल्लीबोळात भिर भिर भटकली; Video
  • काळंकुट्टं पाणी… काळाने मिठी मारावी असं दृश्य, ग्यिरोंग इमिग्रेशन सेंटर बघता बघता गेलं वाहून; Video
  • वैभव सूर्यवंशीला लागणार आणखी मोठी लॉटरी? माजी कर्णधारानेच सांगून टाकलं; कसोटी क्रिकेटमध्ये…
  • लासलगाव कांदा एक्स्प्रेसला 28 तासांचा विलंब, 500 टन कांदा दिल्ली…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in