• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

अमिताभ बच्चन यांना या गाण्यातील ओळ वाटली ‘बकवास’, पण ती ओळ निघाली पंतप्रधानांचे भाषण!

August 3, 2026 by admin Leave a Comment


बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केले. त्यांच्या चित्रपटांइतकीच त्यातील गाणीही लोकप्रिय ठरली. त्यापैकी 1977 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'अमर अकबर अँथनी' या सुपरहिट चित्रपटातील 'माय नेम इज अँथनी गोंसाल्व्हस' हे गाणं आजही प्रेक्षकांच्या आवडीचे आहे.

मात्र या गाण्याशी संबंधित एक रंजक किस्सा स्वतः अमिताभ बच्चन यांनी सांगितला होता. मनमोहन देसाई दिग्दर्शित आणि निर्मित 'अमर अकबर अँथनी' या चित्रपटाची कथा कादर खान यांनी लिहिली होती. चित्रपटातील बहुतांश गाणी किशोर कुमार मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांनी गायली आहेत.

मात्र या गाण्याशी संबंधित एक रंजक किस्सा स्वतः अमिताभ बच्चन यांनी सांगितला होता. मनमोहन देसाई दिग्दर्शित आणि निर्मित 'अमर अकबर अँथनी' या चित्रपटाची कथा कादर खान यांनी लिहिली होती. चित्रपटातील बहुतांश गाणी किशोर कुमार, मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांनी गायली आहेत.

'माय नेम इज अँथनी गोंसाल्व्हस' या गाण्यात किशोर कुमार यांच्यासोबत अमिताभ बच्चन यांनीही आवाज दिला आहे. गाण्याच्या सुरुवातीला अमिताभ बच्चन एक अवघड इंग्रजी वाक्य बोलताना दिसतात. चित्रपटातील अँथनी हे पात्र स्वतःला इंग्रजीचे मोठे ज्ञान असल्याचा आव आणत असते पण प्रत्यक्षात त्याला इंग्रजी नीट येत नसते. त्यामुळे मुद्दाम चुकीच्या आणि अतिशयोक्तीपूर्ण शैलीत हा संवाद बोलण्यात आला होता.

'माय नेम इज अँथनी गोंसाल्व्हस' या गाण्यात किशोर कुमार यांच्यासोबत अमिताभ बच्चन यांनीही आवाज दिला आहे. गाण्याच्या सुरुवातीला अमिताभ बच्चन एक अवघड इंग्रजी वाक्य बोलताना दिसतात. चित्रपटातील अँथनी हे पात्र स्वतःला इंग्रजीचे मोठे ज्ञान असल्याचा आव आणत असते, पण प्रत्यक्षात त्याला इंग्रजी नीट येत नसते. त्यामुळे मुद्दाम चुकीच्या आणि अतिशयोक्तीपूर्ण शैलीत हा संवाद बोलण्यात आला होता.

अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये सांगितले होते की हा संवाद बोलण्यापूर्वी त्यांनी मनमोहन देसाई यांची परवानगी घेतली होती. त्यावेळी त्यांनी केवळ विनोदी परिणाम साधण्यासाठी शब्दांची जुळवाजुळव केली होती. मात्र अनेक वर्षांनंतर त्यांच्या टीमने शोध घेतला असता हा संवाद 1878 मध्ये ब्रिटनचे तत्कालीन पंतप्रधान बेंजामिन डिझरेली यांनी संसदेत केलेल्या भाषणाशी बऱ्याच अंशी मिळताजुळता असल्याचे समोर आले.

अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये सांगितले होते की, हा संवाद बोलण्यापूर्वी त्यांनी मनमोहन देसाई यांची परवानगी घेतली होती. त्यावेळी त्यांनी केवळ विनोदी परिणाम साधण्यासाठी शब्दांची जुळवाजुळव केली होती. मात्र अनेक वर्षांनंतर त्यांच्या टीमने शोध घेतला असता हा संवाद 1878 मध्ये ब्रिटनचे तत्कालीन पंतप्रधान बेंजामिन डिझरेली यांनी संसदेत केलेल्या भाषणाशी बऱ्याच अंशी मिळताजुळता असल्याचे समोर आले.

 फरक इतकाच की मूळ भाषणात 'intoxicated' ऐवजी 'inebriated' हा शब्द वापरण्यात आला होता. ही बाब समजल्यानंतर अमिताभ बच्चन यांनाही मोठा धक्का बसला होता. चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी आपण हे शब्द केवळ विनोदी शैलीत उच्चारले होते त्यामागे कोणताही विशेष हेतू नव्हता असे अमिताभ बच्चन यांनी नमूद केले. त्यामुळे या गाण्यामागचा हा रंजक किस्सा आजही चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरतो.

फरक इतकाच की मूळ भाषणात 'intoxicated' ऐवजी 'inebriated' हा शब्द वापरण्यात आला होता. ही बाब समजल्यानंतर अमिताभ बच्चन यांनाही मोठा धक्का बसला होता. चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी आपण हे शब्द केवळ विनोदी शैलीत उच्चारले होते, त्यामागे कोणताही विशेष हेतू नव्हता, असे अमिताभ बच्चन यांनी नमूद केले. त्यामुळे या गाण्यामागचा हा रंजक किस्सा आजही चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरतो.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • रॉयल एनफील्डचा धमाका! आयकॉनिक Continental GT 650 नवीन फीचर्ससह लाँच; जाणून घ्या किंमत
  • पाय बांधले, डोक्यावर वार.. NEET विद्यार्थिनीच्या हत्येने शहर हादरलं; पोस्टमॉर्टम रिपोर्टने उडवली खळबळ
  • आता इराणला हरवणे अशक्य ? अमेरिकेशी युद्ध सुरु असताना इराणला गवसला मोठा खजाना…
  • मोठा दणका! मुंबईत मंत्र्यांच्या फ्लॅटवर थेट कारवाई, उच्चभ्रू टॉवरमधील 128 फ्लॅटवर हतोडा?
  • भाजपच्या सर्वात ताकदवर संसदीय समितीत फडणवीसांची एंट्री? दिल्ली वाऱ्या वाढल्या

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in