• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

अपघात की खून? हायवेवर सापडलेल्या मृतदेहाचं गूढ उकललं, मेहुण्याकडून भाऊजींचा गेम, कारण ऐकून थरकाप उडेल!

June 8, 2026 by admin Leave a Comment


मिरज-पंढरपूर महामार्गावरील हॉटेल प्रेम चोरोची परिसरात सापडलेल्या दत्तात्रय चाबरे यांच्या मृत्यूचे गूढ अखेर उकलले आहे. हा कोणताही अपघात किंवा अकस्मात मृत्यू नसून, चक्क विम्याचे पैसे लाटण्यासाठी मेहुण्यानेच सुपारी देऊन घडवून आणलेला निर्घृण खून असल्याचे कवठेमहांकाळ पोलिसांनी तपासात निष्पन्न केले आहे. धोंड्याच्या पवित्र महिन्यात मेहुण्यानेच भाऊजींचा गेम फिक्स केल्याची घटना समोर आल्याने सांगली जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली आहे.

अपघात नव्हे घातपात! पोलिसांना असा आला संशय

१९ मे रोजी मिरज–पंढरपूर महामार्गावर दत्तात्रय चाबरे यांचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आला होता. सुरुवातीला स्थानिक पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. मात्र, मृतदेहाची स्थिती आणि घटनास्थळावरील काही संशयास्पद बाबींमुळे पोलिसांना घातपाताचा संशय आला. पोलीस निरीक्षक प्रवीण कांबळे यांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवत तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीदारांचे जाळे सक्रिय केले.

३0 लाखांचा विमा अन् ३ लाखांची सुपारी

पोलीस निरीक्षक प्रवीण कांबळे यांनी सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईल लोकेशनचा सखोल तपास केला असता त्यांच्यासमोर धक्कादायक माहिती उघड झाली. मृत दत्तात्रय चाबरे यांचा मेहुणा रामचंद्र खिलारे याने चाबरे यांच्या नावे तब्बल ३० लाख रुपयांचा अपघाती विमा काढला होता. धक्कादायक बाब म्हणजे या विम्याचे हफ्ते देखील मेहुणा रामचंद्र स्वतःच भरत होता.

मात्र भाऊजींचा अपघाती मृत्यू दाखवून विम्याची ३० लाख रुपयांची रक्कम आपल्या बहिणीला मिळावी, त्यानंतर ती रक्कम स्वतः लाटता यावी, असा क्रूर कट रामचंद्रने रचला होता. यासाठी त्याने तुकाराम सांगोलकर नावाच्या इसमाला ३ लाख रुपयांची सुपारी दिली. या दोघांनी संगनमत करून अगदी पद्धतशीरपणे दत्तात्रय चाबरे यांचा काटा काढला. यानंतर त्याला अपघाताचे रूप देण्याचा प्रयत्न केला.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

या खळबळजनक गुन्ह्याचा तपास सांगलीचे जिल्हा पोलिसांकडून केला जात होता.  याप्रकरणी दोन्ही मुख्य संशयितांना मेहुणा रामचंद्र खिलारे आणि सुपारी घेणारा तुकाराम सांगोलकर याला अटक केली आहे. सुरुवातीला हा अपघात वाटत असला तरी तांत्रिक तपास आणि सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आम्ही या गुन्ह्याचा छडा लावला आहे. विम्याच्या रक्कमेसाठी मेहुण्यानेच सुपारी देऊन हा खून घडवून आणल्याचे निष्पन्न झाले असून, दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे.

न्यायालयीन कोठडीत घेऊन त्यांची पुढील चौकशी केली जात आहे, अशी माहिती कवठेमहांकाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण कांबळे यांनी दिली. सध्या या दोन्ही आरोपींची पोलीस कोठडीत कसून चौकशी सुरू आहे. या गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास कवठेमहांकाळ पोलीस करत आहेत. पोलिसांच्या या कामगिरीमुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले असून परिसरातून पोलिसांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • चौथी पासांसाठी खुश खबर, थेट सरकारी नोकरी, मुंबई हायकोर्टातच व्हा भरती, पटापट करा अर्ज
  • नाशिकच्या कुंभमेळ्याच्या खर्चातील 0.1 टक्के…; संजय राऊतांकडून न्यायमूर्ती वराळेंचं कौतुक, पण मनातलंही बोलूनही दाखवलं
  • Bigg Boss फेम भजन सम्राट वयाच्या 73 व्या वर्षी उरकणार चौथं लग्न? म्हणाले, ‘3 लग्न करण्यास मनाई नाही, पण बायका ठेवण्यास…’,
  • चपाती लगेच कडक होते? फुगत नाही? कणिक मळताना करताय या चुका
  • ‘अभिनेता सिद्धार्थ जाधवची मृत्यूशी झुजं…’, भडकला अभिनेता, पोस्ट करत म्हणाला, ‘घाई तरी कसली…’

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in