• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Yavatmal | धक्कादायक! सहा महिन्यात 34 आदिवासी मुली बेपत्ता, भाजप नेत्याचे खळबळजनक आरोप, नेमकं प्रकरण काय?

April 19, 2026 by admin Leave a Comment


राळेगाव तालुक्यातील आदिवासी मुली बेपत्ता होण्याच्या घटनांनी जिल्ह्यात चिंता वाढली आहे. मागील सहा महिन्यांत तब्बल 34 मुली गायब झाल्याची माहिती समोर आली असून, या प्रकरणात मानवी तस्करीचा संशय व्यक्त केला जात आहे. काही दिवसांपूर्वी समोर आलेल्या कथित ऑडिओ क्लिपमध्ये मुलींना फसवून बाहेरच्या राज्यांमध्ये पाठवल्याचे प्रकार उघड झाल्याचं सांगितलं जात आहे.

या प्रकरणात मजहर कुरेशी नावाच्या व्यक्तीवर मुख्य आरोपी असल्याचा आरोप केला जात आहे. दरम्यान, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल चव्हाण यांनी अल्पवयीन मुलींना परराज्यात विकले जात असल्याचा गंभीर आरोप केला आहे. या पार्श्वभूमीवर आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी पोलिस अधिकाऱ्यांशी चर्चा करून सखोल तपासाचे आदेश दिले आहेत. प्रशासनाने लवकरात लवकर सत्य समोर आणावे, अशी मागणी स्थानिकांकडूनही होत आहे. एकूणच हे प्रकरण खूप गंभीर असल्याचं सांगितलं जात आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, किलिंग मशिनला नष्ट करण्याची वेळ आली…
  • आशा भोसले यांच्यानंतर इंडस्ट्रीतील आणखी एका दिग्गज व्यक्तीचं निधन
  • KKR vs RR : फिनिशर रिंकु, सिक्स ठोकून जिंकवलं, राजस्थानचा धुव्वा, पाहा व्हीडिओ
  • एका दारुच्या बॉटलने किती नशा चढते, नेमकं कसं ठरवलं जातं? वाचा लॉजिक!
  • कृपया असे व्हिडीओ पोस्ट करू नका..; आशा भोसले यांची नात जनाईने व्यक्त केली नाराजी

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in