• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

WT20 WC 2026 : करो या मरोच्या सामन्यात भारत ऑस्ट्रेलिया आमनेसामने, कुठे पाहाल सामना? जाणून घ्या

June 27, 2026 by admin Leave a Comment


वुमन्स टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या साखळी फेरीचे सामने अंतिम टप्प्यात आले आहेत. आतापर्यंत ब गटातून इंग्लंडने उपांत्य फेरीत जागा पक्की केली आहे. तर अ गटातील दोन्ही संघांचं अजून काही ठरलेलं नाही. त्यामुळे रविवारचे सामने महत्त्वाचे असणार आहेत. उपांत्य फेरीच्या शर्यतीत ऑस्ट्रेलिया, भारत आणि दक्षिण अफ्रिका हे संघ आहे. तिन्ही संघांना उपांत्य फेरीची संधी आहे. त्यात ऑस्ट्रेलियाने शेवटचा सामना गमावला तरी नेट रनरेटच्या आधारावर उपांत्य फेरीचं तिकीट मिळू शकतं. पण भारत आणि दक्षिण अफ्रिकेसाठी करो या मरोची स्थिती आहे. दक्षिण अफ्रिकेचा सामना बांगलादेशशी होणार आहे. तसं पाहिलं तर दक्षिण अफ्रिकेसाठी हा सोपा पेपर आहे. पण भारताचा सामना बलाढ्य ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. त्यामुळे या सामन्यात विजय मिळवणं खूपच कठीण असेल, असं क्रीडाप्रेमींचं म्हणणं आहे. त्यामुळे भारतासाठी करो या मरोची स्थिती आहे. भारताने हा सामना गमावला आणि दक्षिण अफ्रिकेने बांगलादेशविरुद्ध सामना जिंकला तर भारतीय संघ आऊट होईल. पण दक्षिण अफ्रिकेचा पराभव झाला तर भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना गमावला तरी नेट रनरेटच्या आधारावर उपांत्य फेरीचं तिकीट मिळू शकतं.

भारत आणि ऑस्ट्रेलिया हेड टू हेड

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 37 वेळा टी20 सामन्यात लढत झाली आहे. यात ऑस्ट्रेलियाचा वरचष्मा आहे. ऑस्ट्रेलियाने 27 सामने जिंकले आहेत. तर भारताने फक्त 9 सामन्यात विजय मिळवला आहे. एक सामना बरोबरीत सुटला आहे. वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धेतही ऑस्ट्रेलिया 5-1 आघाडीवर आहे. 2020 मध्ये अंतिम फेरीत आणि 2023 मध्ये उपांत्य फेरीत भारताला पराभूत केलं होतं. 2018 साली साखळी फेरीत भारताने ऑस्ट्रेलियाला पराभूत केलं आहे. तेव्हा स्मृती मंधानाने 83 धावा केल्या होत्या.

भारत ऑस्ट्रेलिया सामना केव्हा आणि कुठे खेळला जाईल?

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना रविवारी (28 जून) लंडन येथील लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर खेळला जाईल. हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी 7.00 वाजता सुरू होईल.

भारत ऑस्ट्रेलिया सामन्याची नाणेफेक कधी होईल?

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया आयसीसी महिला टी20 वर्ल्डकप 2026 सामन्याची नाणेफेक भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी 6.30 वाजता होईल.

भारत ऑस्ट्रेलिया सामना कुठे पाहाल?

ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत वुमन्स टी20 वर्ल्डकप 2026 क्रिकेट सामना जिओहॉटस्टारवर थेट पाहता येईल. तसेच सामन्याचे थेट प्रक्षेपण भारतातील स्टार स्पोर्ट्स 1, स्टार स्पोर्ट्स 1 एचडी, स्टार स्पोर्ट्स 2, स्टार स्पोर्ट्स 2 एचडी, स्टार स्पोर्ट्स 3 आणि स्टार स्पोर्ट्स 3 एचडी टीव्ही चॅनेलवर उपलब्ध असेल. तसेच लाईव्ह अपडेट तुम्हाला टीव्ही 9 मराठीवरही मिळतील.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मुंबई पोलिसांच्या ताफ्यात 100 नवीन वाहनं, अदाणी फाऊंडेशनकडून 15 कोटींचा निधी
  • CCTV फुटेज, रेकॉर्डिंग सगळं बाहेर काढेन; ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्रीचा थेट इशारा, म्हणाली ‘27.11.23’ची ती सकाळ आठवतेय?
  • Sugar Price Hike : साखरेचा भाव वाढताच प्रशासनाचा मोठा आदेश, आता 30 दिवसांपेक्षा जास्त काळ…सामान्यांवर काय परिणाम होणार?
  • IND vs SL : रवींद्र जडेजाने अखेर सूड घेण्यासाठी सात दिवस घेतले! श्रीलंकन खेळाडूसोबत काय घडलं होतं?
  • मराठी सक्तीविरोधात रिक्षा, टॅक्सी चालकांची उच्च न्यायालयात धाव

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in