• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

WT20 WC: टीम हॉटेलमध्ये आलिया पतीसोबत राहिली, कॅप्टन-कोचमध्ये वाद! पाकिस्तान संघात बरंच काही घडलं

June 24, 2026 by admin Leave a Comment


वुमन्स टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत पाकिस्तानची कामगिरी सुमार राहिली आहे. आतापर्यंत खेळलेल्या चार पैकी चार सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे. त्यामुळे उपांत्य फेरी गाठण्याचं स्वप्न भंगलं आहे. असं असताना या संघात बरेच वाद असल्याचं आता समोर आलं आहे. रिपोर्टनुसार, पाकिस्तान संघाची कर्णधार फातिमा सना आणि हेच कोच वहाब रियाज यांच्यात जोराचं भांडणं झालं आहे. सनाने एका सामन्यातील पराभवानंतर थेट कोच वहाब रियाजवर बोट दाखवलं आहे. दुसरीकडे, संघाची वरिष्ठ खेळाडू आलिया रियाज देखील वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. आलिया रियात पाकिस्तानच्या टीम हॉटेलमध्ये पतीसोबत राहत होता. त्यावर सना मीर नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे पाकिस्तान संघात बरंच काही घडत असल्याच दिसत आहे. 23 जून रोजी लीड्सवर ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला पराभूत केलं आणि सर्व वाद एका पाठोपाठ एक बाहेर आले.

कर्णधार फातिमा सना वैतागली

मिडिया रिपोर्टनुसार, संघाचे मेंटॉर आणि हेड कोच वहाब रियाज आणि कर्णधार फातिमा सना यांच्या निवडीवरून मतभेद होते. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात कर्णधार फातिमा सना आलिया रियाजला बसवणार होती. पण वहाबने आलियाची निवड करण्यावर जोर दिला. त्यामुळे नाईलजास्तव आलियाला संघात घ्यावं लागलं. हा सामना पाकिस्तानने गमावला. त्यामुळे कर्णधार फातिमा सना संतापली. तिने या पराभवासाठी थेट हेड वहाबला जबाबदार धरलं.

फातिमा सनाने सामन्यानंतर सांगितलं की, ‘मला वाटते की आज आमच्याकडे कोणतीही सबब नाही, पण मला वाटते की फलंदाजीत आमची कामगिरी अपेक्षेप्रमाणे नव्हती आणि या कामगिरीची जबाबदारी आम्हीच घेतली पाहिजे. एक संघ म्हणून आणि वरिष्ठ खेळाडूंनी अशा प्रकारच्या सामन्यांमध्ये अधिक चांगली कामगिरी केली पाहिजे.’

आलिया रियाज आणि तिच्या पतीमुळे संताप

बांगलादेशविरुद्धच्या सामन्यापूर्वी वरिष्ठ खेळाडू आलिया रियाज पतीसोबत टीम हॉटेलमध्ये थांबली होती. त्यावर कर्णधार फातिमा सनाने आक्षेप नोंदवला होता. रिपोर्टनुसार, सनाने आक्षेप नोंदवल्यानंतर अली यूनिसला रूम सोडण्यास सांगितलं होतं. इतकंच काय तर या सामन्यापूर्वी आलिया पतीसोबत फिरण्यासाठी गेली होती. . त्या दिवशी पाकिस्तान संघाचा सराव होता. आलिया रियाज या स्पर्धेत पूर्णपणे निष्फळ ठरली. तिने चार सामन्यात फक्त 35 धावा केल्या. स्ट्राईक रेटही 77.77 चा होता.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • रेल्वे पटऱ्या उखडू, विमानतळं उखडू, त्या निर्णयावर मनोज जरांगे संतापले, आंदोलनाबाबत सरकारला थेट इशारा!
  • कुंभमेळ्याच्या खर्चावर इम्तियाज जलील यांचा आक्षेप, म्हणाले, 30 हजार कोटींमध्ये… त्या विधानाची राज्यात चर्चा
  • नेपाळला भारताकडून तातडीची मदत; NDRF पथके, IAF सज्ज
  • रवींद्र जडेजा-सारांश जैनच्या नो बॉलमुळे टीम इंडियाची डोकेदुखी, प्रशिक्षकाने थेट सांगितला जालीम उपाय
  • Snake Safety Tips In Monsoon : कारच्या इंजिनापासून टॉयलेटपर्यंत… पावसाळ्यात साप इथेच का लपतात?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in