• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Snake Safety Tips In Monsoon : कारच्या इंजिनापासून टॉयलेटपर्यंत… पावसाळ्यात साप इथेच का लपतात?

August 26, 2026 by admin Leave a Comment


Snake Safety Tips In Monsoon : पावसाळा आला की गरमी कमी होते आणि आजूबाजूच्या वातावरणात गारवा वाढतो. मात्र पावसाच्या पाण्यामुळे ओलावाही येतो, जमीन गार होते आणि अशाचवेळी सापांचा धोका वाढण्याची शक्यता असते. पावसाळ्यात अनेकदा एखाद्या घरात, कारमध्ये, स्कूटरमध्ये किंवा अगदी टॉयलेटमध्ये साप शिरल्याच्या घटना समोर येतात. मात्र बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो की, शेवटी साप या ठिकाणी पोहोचला तरी कसा आणि तिथे
त्यांना मिळतं तरी काय ? यामागे कोणतेही रहस्यमय कारण नसून, सापांच्या नैसर्गिक सवयी आणि गरजा कारणीभूत असतात. साप नेमका कार, स्कूटर आणि टॉयलेटसारख्या ठिकाणी का पोहोचतात आणि त्यापासून बचाव करण्यासाठी कोणती खबरदारी घ्यावी हे जाणून घेऊया.

खरंतर साप हे थंड रक्ताचे प्राणी आहेत. याचा अर्थ असा की, ते माणसांप्रमाणे किंवा इतर प्राण्यांप्रमाणे आपल्या शरीराचे तापमान स्वतः नियंत्रित करू शकत नाहीत. त्यासाठी साप हे आजूबाजूच्या वातावरणावर अवलंबून असतात. त्यामुळे साप कधी उबदार जागा, तर कधी थंड, सावलीची किंवा ओलसर जागा शोधतात. थंड बाथरूम, ओलसर पाइपलाइन आणि सावलीतील पार्किंगची ठिकाणं, इथे त्यांना थंड व सुरक्षित आसरा मिळू शकतो. तर थंडी असेल तेव्हा एखाद्या वाहनाचं गरम इंजिन हे त्यांना थंडीपासून बचाव करण्यासाठी उबदारपणा देतं. हवामान आणि वेळेनुसार साप उष्णता, थंडावा किंवा ओलावा शोधत अशा ठिकाणी पोहोचू शकतात.

कारच्या इंजिनात का लपतात साप ?

एखाद्या कारचं इंजिन हे सापांसाठी अनेक कारणांमुळे आकर्षक ठरू शकतं. जेव्हा आपण रस्त्यावर एखादं वाहन चालवतो तेव्हा त्याचं इंजिन हे गरम होतं आणि त्याच्या आसपास अनेक लहान-लहान मोकळ्या जागा असतात, जिथे साप सहज लपून बसू शकतो. जर एखादी कार अनेक दिवस एकाच जागी उभी असेल आणि त्या कारच्या आसपास झुडपं, गवत किंवा उघडा नाला वगैरे असेल, तर साप तिथे पोहोचण्याची शक्यता वाढते. विशेषतः पावसाळ्यात सापांच्या नैसर्गिक अधिवासात पाणी साचल्यामुळे ते कोरडी आणि सुरक्षित जागा शोधण्यासाठी बाहेर पडू शकतात.

याशिवाय, कारच्या इंजिनच्या आसपास उंदीरही आपला आसरा बनवण्याची शक्यता असते. त्यामुळे अन्नाच्या शोधात साप अशा इंजिनापर्यंत पोहोचू शकतो. म्हणजेच अनेकदा सापाला त्या कारच्या आसपास असलेले उंदीर तिथे घेऊन येतात.

स्कूटरमध्ये कसा शिरतो साप ?

कारप्रमाणाचे एखादी स्कूटर आणि इतर दुचाकी वाहनांमध्येही असे अनेक भाग असतात, जिथे साप लपून बसू शकतो. जिथे गवत, झुडपे किंवा कचरा जास्त असेल अशा ठिकाणी एखादं वाहन बराच काळ उभं असेल तर साप तिथेही आसरा घेऊ शकतो. तसेच पावसाळ्यात हा धोका काही प्रमाणात वाढू शकतो, कारण पाण्यापासून बचाव करण्यासाठी साप कोरडी आणि सुरक्षित जागा शोधतात. वाहनाचा आतील भाग त्यांना काही काळासाठी अशीच सुरक्षित जागा देऊ शकतो.

टॉयलेटमध्ये का शिरतात साप ?

टॉयलेटमध्ये साप आढळणं – ऐकायला जरी हे अतिशय भीतीदायक वाटलं, तरी ते पूर्णपणे अशक्य नाही. साप सहसा थेट टॉयलेटमधून घरात येत नाहीत. अनेकदा ते सीवर लाइन, उघड्या ड्रेनेज पाइप किंवा सेप्टिक टँकच्या मार्गाने आत येण्याची शक्यता असते.

जुन्या घरांमध्ये, तळमजल्यावरील बाथरूममध्ये तसेच उघडे नाले किंवा सेप्टिक टँक हे ज्या घरांच्या जवळ असतात, तिथे अशा घटना घडण्याची किंवा साप आढळण्याची शक्यता तुलनेने जास्त असू शकते. पाऊस आणि पुराच्या वेळी सीवर किंवा नाल्यांमध्ये पाण्याची पातळी वाढल्याने साप सुरक्षित जागेच्या शोधात बाहेर पडू शकतात.

तसेच ड्रेनेजमध्ये जर उंदीर किंवा बेडूक असं सापांचं खाद्य असेल तर भक्ष्याच्या शोधात ते तिथेही पोहोचू शकतात. तेच त्यांच्या खाण्याचा मोठा सोर्स असतात.

सापांपासून वाचण्यासाठी काय करावं ?

काही छोट्या-छोट्या खबरदारीच्या उपायांमुळे साप घरात किंवा वाहनात शिरण्याची शक्यता कमी करता येते.

– तुमची गाडी ही घनदाट झाडी किंवा गवताजवळ पार्क करणं टाळा.

– जर तुमची कार बऱ्याच काळापासून एका विशिष्ट जागी उभी असेल तर ती सुरू करण्यापूर्वी बोनेट उघडून आत काही नाही ना हे आधील चेक करा.

– घरातील ड्रेन आणि पाइपवर योग्य झाकण किंवा कव्हर लावून ठेवा.

– सेप्टिक टँक तसेच उघड पाईप, यांचे मार्ग अगदी नीट, घट्ट बंद करा.

– बाथरूममध्ये ड्रेन कव्हरचा वापर करा.

– तुमच्या घराजवळ किंवा गॅरेजजवळ उंदरांचा तक्रास असेल तर त्याची वेळीच खबरदारी घ्या, विल्हेवाट लावा.

– पावसाळ्यात घराच्या आसपास साचलेला कचरा आणि झुडपे नियमितपणे साफ करा.

कार किंवा टॉयलेटमध्ये साप आढळला तर काय करावं ?

जर तुमची कार, स्कूटर किंवा घरामध्ये साप दिसला, तर त्याला पकडण्याचा किंवा हुसकावून लावण्याचा प्रयत्न अजिबात करू नका. मुलांना आणि इतर व्यक्तींना त्या ठिकाणापासून दूर ठेवा आणि प्रशिक्षित सर्पमित्र/स्नेक रेस्क्यूअर किंवा स्थानिक वन विभागाशी संपर्क साधून त्यांना बोलवा.

(डिस्क्लेमर : वरील लेखात देण्यात आलेली माहिती ही प्राथमिक स्वरूपाची आहे.साप दिसला किंवा आढळला तर तो स्वत: पकडण्याचा प्रयत्न करू नका. स्थानिक वन विभाग किंवा प्रशिक्षीत वन्यजीव रेस्क्यू टीमशी संपर्क साधा. )



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • रेल्वे पटऱ्या उखडू, विमानतळं उखडू, त्या निर्णयावर मनोज जरांगे संतापले, आंदोलनाबाबत सरकारला थेट इशारा!
  • कुंभमेळ्याच्या खर्चावर इम्तियाज जलील यांचा आक्षेप, म्हणाले, 30 हजार कोटींमध्ये… त्या विधानाची राज्यात चर्चा
  • नेपाळला भारताकडून तातडीची मदत; NDRF पथके, IAF सज्ज
  • रवींद्र जडेजा-सारांश जैनच्या नो बॉलमुळे टीम इंडियाची डोकेदुखी, प्रशिक्षकाने थेट सांगितला जालीम उपाय
  • Snake Safety Tips In Monsoon : कारच्या इंजिनापासून टॉयलेटपर्यंत… पावसाळ्यात साप इथेच का लपतात?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in