• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Womens T20 World Cup 2026 : दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा पराभव टीम इंडियासाठी शुभसंकेत!

June 23, 2026 by admin Leave a Comment


आयसीसी वुमन्स टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत टीम इंडियाला रविवारी 21 जून रोजी पहिल्या पराभवाचा सामना करावा लागला. दक्षिण आफ्रिकेने भारतावर 6 विकेट्सने विजय मिळवला. भारताला हा सामना जिंकून सेमी फायनलमधील आपलं स्थान आणखी मजबूत करण्याची संधी होती. मात्र आता भारतासाठी जर तरचं समीकरण तयार झालं आहे. तर भारतासाठी दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा पराभव शुभसंकेत मानला जात आहे. (Photo Credit : Tv9 Bharatvarsh)

Harmanpreet Kaur and Laura Wolvaardt IND vs SA

दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा पराभव भारतासाठी शुभसंकेत का? याचं उत्तर गेल्या 2 वर्ल्ड कप स्पर्धेतून मिळेल. भारताचा दोन्ही वर्ल्ड कप स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेविरुद्धच पहिला पराभव झाला होता. मात्र त्यानंतर भारतीय संघाने वर्ल्ड कप जिंकला होता. (Photo Credit : Tv9 Bharatvarsh)

Harmanpreet Kaur Team India

वुमन्स टीम इंडियाला आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2025 स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेने पहिल्यांदा पराभूत केलं होतं. त्यानंतर भारतीय महिला संघाने पहिल्यांदा वर्ल्ड कप ट्रॉफीवर नाव कोरलं होतं. (Photo Credit : Tv9 Bharatvarsh)

Mens 2026 T20i World Cup Winner Team India

त्यानंतर मेन्स टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतही दक्षिण आफ्रिकेने भारताला पहिल्यांदा पराभूत केलं. मात्र त्यानंतर टीम इंडियाने सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात वर्ल्ड कप जिंकल्याचं क्रिकेट विश्वाला माहित आहे. (Photo Credit : Tv9 Bharatvarsh)

Smriti Mandhana and Harmanpreet Kaur

त्यानंतर आता तसाच प्रकार टी 20i वुमन्स वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत पाहायला मिळालाय. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताचा पहिला पराभव झालाय. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा पहिला पराभव भारतीय संघासाठी वर्ल्ड कप ट्रॉफी जिंकण्याबाबत तिसऱ्यांदा लकी ठरणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. (Photo Credit : Tv9 Bharatvarsh)



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • उद्धव ठाकरेंच्या बाजूला बसलेलेही त्यांनी फसवतायेत? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
  • Tata Sierra EV ‘या’ दिवशी होणार लॉन्च, शक्तिशाली QWD डुअल मोटरसह टीझर रिलीज
  • शिवसेना शिंदे गटात येण्याची घोषणा करण्यापूर्वी नेमकं काय घडलं? ओमराजेंबाबत खळबळजनक माहिती समोर, रात्री दोन वाजता…
  • Sanjay Raut | शिंदे-मींदे बाळंत झालेत, 6 गद्दारांना जन्म दिला, नंदनवनात पाळणा…शिंदेंवर राऊतांचा हल्लाबोल
  • Omraje Nimbalkar | पक्ष प्रवेशापूर्वीच मोठं घडलं; शिंदेकडून ओमराजेंना मोठं गिफ्ट? थेट दिल्लीत…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in