• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Weather Update : अल निनोचा धोका टळला? राज्यात पाऊस कसर भरून काढणार, आएमडीकडून या वर्षीचा सुधारीत अंदाज जारी

June 24, 2026 by admin Leave a Comment


महाराष्ट्रात मान्सून सक्रिय झाला आहे, जून महिन्यामध्ये पावसात मोठा खंड पडला होता, त्यामुळे सर्वांचीच चिंता वाढली होती. मात्र आता  गुड न्यूज समोर आली आहे. मंगळवारपासून राज्यात पुन्हा एकदा मान्सून सक्रिय झाला आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाला सुरुवात झाली असून, या पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे, दरम्यान मान्सूनच्या पार्श्वभूमीवर आता भारतीय हवामान विभाग ( IMD) कडून नवा अंदाज जारी करण्यात आला आहे.  नागपूर वेधशाळेचे हवामानशास्त्रज्ञ प्रविण कुमार यांनी मान्सूनच्या पुढील वाटचालीबद्दल माहिती दिली आहे. पुढील काही दिवसांमध्ये राज्यता पावसाचा जोर आणखी वाढणार असल्याचा अंदाज आहे.

काय आहे हवामान विभागाचा नवा अंदाज? 

आज महाराष्ट्राच्या अधिकांश भागात मान्सूनचा पाऊस कोसळतो आहे, येणाऱ्या चार ते पाच दिवसांपर्यंत महाराष्ट्रसह विदर्भात चांगला पाऊस पहायाला मिळणार आहे, काही भागांमध्ये 30 ते 40 टक्के पावसाचा अंदाज आहे.  महाराष्ट्राच्या बऱ्याच क्षेत्रात चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे, पावसाचा अंदाज नॉर्मल असला तरी तो पाऊस चांगला राहणार आहे.  यावेळी उशिरा पाऊस आल्याने मोठा फरक पडला होता, मात्र पहिला पाऊस जो आला तो चांगला आला असल्याने बऱ्यापैकी जो फरक होता तो कमी झाल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र काही प्रमाणात फरक अजूनही आहे. त्याची भरपाई येणाऱ्या काळात होण्याची शक्यता आहे, असं प्रवीण कुमार यांनी म्हटलं आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की, जो फरक होता तो काही भागात कमी होण्याची शक्यता आहे. मागील काही दिवसांमध्ये मान्सूनचे जे ऍडव्हान्समेंट झाली, जो मोठ्या प्रमाणात पाऊस थांबला होता त्यावर अल् निनोचा प्रभाव होता आणि इंडियन ओशियन डायफरचा देखील प्रभाव होता, त्यामुळे पावसाचं प्रमाण कमी झालं. येणाऱ्या दिवसात सुद्धा पाऊस सर्वसाधारण असणार आहे. यावर्षीचा पाऊस सामान्य पेक्षा कमीच राहणार आहे कारण अल निनोचा यावरील प्रभाव हळूहळू वाढत जाणार आहे.

आमचा पूर्वानुमान जर बघितला तर पाच ते सात दिवस चांगल्या पावसाचा अंदाज व्यक्त केलेला आहे, पालघर, कोकण विभाग किंवा विदर्भ या भागांमध्ये तीन ते पाच दिवसांमध्ये हेवी रेन फॉलची वार्निंग देण्यात आलेली आहे. काही भागांमध्ये चांगला पाऊस पडत असल्याचं दिसून येत आहे. पुढील पाच ते सात दिवसांमध्ये राज्यात जोरदार पावसाची शक्यता आहे, असं प्रवीण कुमार यांनी म्हटलं आहे.

 



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मुंबई पोलिसांच्या ताफ्यात 100 नवीन वाहनं, अदाणी फाऊंडेशनकडून 15 कोटींचा निधी
  • CCTV फुटेज, रेकॉर्डिंग सगळं बाहेर काढेन; ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्रीचा थेट इशारा, म्हणाली ‘27.11.23’ची ती सकाळ आठवतेय?
  • Sugar Price Hike : साखरेचा भाव वाढताच प्रशासनाचा मोठा आदेश, आता 30 दिवसांपेक्षा जास्त काळ…सामान्यांवर काय परिणाम होणार?
  • IND vs SL : रवींद्र जडेजाने अखेर सूड घेण्यासाठी सात दिवस घेतले! श्रीलंकन खेळाडूसोबत काय घडलं होतं?
  • मराठी सक्तीविरोधात रिक्षा, टॅक्सी चालकांची उच्च न्यायालयात धाव

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in