• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Wayanad Landslide : एका सेकंदात भयानक भूस्खलन, ढिगाऱ्याखाली लोक मुंगीप्रमाणे…धक्कादायक घटनेचा व्हिडीओ समोर!

July 7, 2026 by admin Leave a Comment


Wayanad Landslide : सध्या संपूर्ण देशात पावसाचा हाहा:कार झालेला पाहायला मिळत आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी नुकसान झाले आहे. काही ठिकाणी झाडं उन्मळून पडली आहेत. तर काही ठिकाणी दरड कोसळण्याची घटना घडली आहे. महाराष्ट्रात तर अनेक ठिकाणी लोकांच्या घरात पाणी गेले आहे. पावसाने घातलेल्या या थैमानामुळे सगळेच हतबल झाले आहेत. प्रशासनाची संपूर्ण यंत्रणा कामाला लागलेली असली तरीही विध्वंस टाळता येत नाही. दरम्यान, सध्या पावसाच्या रौद्ररुपामुळे एक मोठे भूस्खलन झाले आहे. या भूस्खलनाचा व्हिडीओ सध्या समोर आसून भूस्खळनाची घटना पाहून सर्वांनाच हादरा बसला आहे.

दुर्घटनेमुळे दोघांचा मृत्यू

मिळालेल्या माहितीनुसार केरळमधील वायनाड येथे टनेल बनवण्याच्या ठिकाणी मोठी दुर्घटना घडली आहे. त्या भागात चक्क भुस्खलन झाले आहे. या दुर्घटनेमुळे दोघांचा मृत्यू झाला असून सहा मजूर जखमी झाले आहेत. वायनाडमध्ये गेल्या काही दिवसांपासून सलग पाऊस पडत आहे. ही घटना समोर आल्यानंतर लोकांना 2024 रोजीच्या दुर्घटनेची आठवण होत आहे. त्या दुर्घटनेत 300 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला होता. सध्याची भूस्खलनाची ताजी घटना ही मीनाश्री ब्रिजजवळ डली आहे. याच भागात अनाक्कमपॉयल-कल्लाडी-मेप्पाडी ट्विन टनल प्रोजेक्टचे काम चालू आहे. या प्रकल्पांतर्गत मलप्पुरम आणइ वायनाड जिल्ह्यांना जोडले जाणार आहे.

याआधीही भूस्खलनाची घटना

वायनाडमध्ये ज्या ठिकाणी भूस्खलन झाले आहे त्याच भागात याआधीही अशी घटना घडलेली होती. 2024 साली झालेली भूस्खलनाची घटना ही सर्वात विध्वंसक होती. सध्याची भूस्खलनाची घटना समोर आल्यानंतर स्थानिक लोकांनी तत्काळ मदतकार्य केले. घटना घडल्यानंतर कल्पेट्टा येथून अग्निशामक दलाचे जवान तसेच रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आले. घटना घडल्यानंतर नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्सनेही बचावकार्यात सहभाग नोंदवला. दरम्यान सध्या घडलेली ही घटना नैसर्गिक नसून मानवनिर्मित आहे, असे म्हटले जात आहे. वैज्ञानिक पद्धतीने खोदकाम न केल्यानेच ही दुर्घटना घडली आहे, अशी टीका केली जात आहे.

CCTv footage of Terrifying Moment of #Landslide near Meenakshi Bridge at #Kalladi , where work on a tunnel road project connecting #Malappuram and #Wayanad districts was going on.

According to #Kerala CM one died, 7 injured, another 7 missing. https://t.co/o4TlS0E48m pic.twitter.com/tjBjPPuWsw

— Surya Reddy (@jsuryareddy) July 7, 2026





Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • आश्रमशाळेतील 35 विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात हलवलं, पालघर पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी, अचानक काय घडलं?
  • भारताच्या राफेल आणि स्कॉर्पीन करारामुळे फ्रान्स चमकला! अमेरिका-रशियाला मागे टाकत बनला जगातील सर्वात मोठा शस्त्र विक्रेता
  • अमेरिकन क्लाइंटकडून डॉलरमध्ये पगार? जाणून घ्या कराचे नियम, ITR आणि GST चे संपूर्ण गणित
  • मोठी बातमी! MPSC कडून घेण्यात आलेली महत्त्वाची परीक्षा रद्द, पेपरफुटीच्या आरोपानंतर निर्णय
  • डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडवणारी बातमी! या देशाने अमेरिकन उत्पादनांवर लादला 20 अब्ज डॉलरचा टॅरिफ

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in