
विरारमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका तांत्रिकाने अल्पवयीन गतिमंद मुलाला बरं करण्याचं स्वप्न दाखवून महिलेवर अत्याचार केला. पीडित महिला तिच्या मुलाला उपचारासाठी या भोंदूकडे घेऊन गेली होती. त्याने मुलाला बरं करण्याचा शब्द दिला. महिलेच्या अंधश्रद्धेचा फायदा उचलत तांत्रिकाने तिच्याशी जवळीक वाढवली. महिलेला अर्नाळा येथील एका रिसॉर्टमध्ये बोलवून तिला शरीरसंबंध ठेवण्यासाठी भाग पाडलं. अजय कमलाकर राऊत असं आरोपीचं नाव आहे. त्याला दोन दिवसाची पोलीस कोठडी दिली होती. वसई न्यायालयात हजर केलं असता आरोपीला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
याबाबत अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात पीडित महिलेच्या तक्रारीवरून भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम 64(1),69, 75, 78 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
(बातमी अपडेट होत आहे)
Leave a Reply