
विद्यानंद बापट हे नाव सध्या सोशल मीडियावर खूपच चर्चेचा विषय बनला आहे. पुण्यातील गणेशोत्सवात वाजवल्या जाणाऱ्या DJ वर बंदी घालावी, अशी मागणी त्याची आहे.
DJ किंवा ढोल-ताशा पथकांमुळे ध्वनीप्रदूषण होत आहे असे त्यांचे म्हणणे आहे. विद्यानंद बापटच्या मताशी काही लोक सहमत आहेत तर काही लोक असहमती दर्शवत आहे. पण या दरम्यान एक चर्चा होत आहे, ती म्हणजे त्यांनी बोललेल्या संस्कृत श्लोकाची.
विद्यानंद म्हणाले होते की “घटं भिन्द्यात् पटं छिन्द्यात् कुर्याद् गर्दभरोहणम्।” आता या श्लोक सोशल मीडियावर सगळ्यांनाच भुरळ पाडली आहे. सोशल मीडियावर या श्लोकावर ्अनेक रिल्सही बनवण्यात आल्या आहेत.
या श्लोकाचा अर्थ काय असा प्रश्न सगळ्यांना पडला होता तर आता विद्यानंद यांनीच याचा अर्थ बोलून दाखवला आहे, “मडके फोडावे, वस्त्र फाडावे आणि गाढवावर बसावे; पण कोणत्याही प्रकारे प्रसिद्ध व्हावे,” असा याचा अर्थ आहे.
हे एक उपरोधिक वाक्य असून समोरच्या व्यक्तीवर टिका करण्यासाठी या वाक्याचा वापर केला जातो. प्रसिद्धी मिळवण्यासाठी माणूस कोणतीही हास्यास्पद, विचित्र किंवा लाजिरवाणी कृती करण्यासही मागेपुढे पाहत नाही, थोडक्यात सांगायचे तर असा या श्लोकाचा आशय आहे.




Leave a Reply