विद्यानंद बापट यांची मागणी जरी डीजे बंदी वर असली तरीही चर्चा ही त्यांच्या अस्खलित आणि शुद्ध मराठीची होत आहे. विद्यानंद बापट यांच्या मराठीचे अनेकांनी कौतुक केले, तर त्यांनी म्हटलेला संस्कृत श्लोकही तितकाच व्हायरल झाला.

विद्यानंद बापट हे काल यांच्या मराठीची भुरळ अनेकांनी पडली आहे, यात स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याही समावेश आहे. फडणवीसांनी आता बापट यांच्या मराठीचे कौतुक केले आहे. फडणवीस म्हणाले की, “ते जशी सुंदर भाषा वापरतात, तशीच त्यांनी आपले विचार मांडताना इतरांना त्रास होणार नाही अशा 'अकोमोडेटिव्ह' (सर्वसमावेशक) पद्धतीने मांडणी करावी.
आता या 'अकोमोडेटिव्ह' शब्दासाठी त्यांनी नेमका कोणता शुद्ध मराठी शब्द वापरला असता, हे समजून घेण्यासाठी मला त्यांच्याकडून ट्युशनच घ्यावी लागेल,” अशी मिश्कील टिप्पणी फडणवीस यांनी केली.
तर ते पुढे म्हणाले की, “सध्या बापट यांची मराठी सोशल मीडियावर चांगलीच ट्रेंडिंग आहे. त्यांच्या बोलण्यातून अस्खलित आणि शुद्ध मराठीचा एक सुंदर नमुना पाहायला मिळतो. केवळ बापटच नव्हे, तर जेव्हा कोणीही अशी समृद्ध भाषा बोलतो तेव्हा ऐकून मनाला आनंद वाटतो.

Leave a Reply