• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Video : शुबमन गिल आणि गुरनूर ब्रार वाचले, Live सामन्यात बेंचवर बसण्याची आली असती वेळ

July 14, 2026 by admin Leave a Comment


भारताने इंग्लंडला पहिल्या वनडे सामन्यात 258 धावांवर रोखलं. आता भारताला विजयासाठी 259 धावांचं आव्हान गाठायचं आहे. भारताने या सामन्यात चांगली गोलंदाजी केली. पण सातव्या विकेटसाठी खूपच झुंजावं लागलं. त्यामुळे इंग्लंडच्या 250 पार धावा झाल्या. या सामन्यात एक क्षण असा आला होता की शुबमन गिल आणि गुरनूर ब्रार जखमी होतात की काय? कर्णधार शुबमन गिलची एक चूक त्यालाच महागात पडली असती. त्यामुळे त्याला गंभीर दुखापत होऊ शकली असती. जोस बटलरचा झेल पकडताना शुबमन गिल आणि गुरनूर ब्रार यांच्यात टक्कर झाली. सुदैवाने गुरनूर ब्रारने झेल पकडला आणि शुबमन गिलला दुखापतही झाली नाही. शक्यतो असे झेल पकडताना दोन खेळाडूंची जबर टक्कर होते आणि दुखापतीमुळे खेळाडूवर मैदानाबाहेर जाण्याची वेळ येते.

गिल आणि ब्रार थोडक्यात वाचले

कर्णधार शुबमन गिलने 17वं षटक प्रसिद्ध कृष्णाच्या हाती सोपवलं होतं. या षटकात जोस बटलरने आक्रमक खेळण्याचा प्रयत्नात होता. त्याने एक जोरदार फटका मारला, पण चेंडू वर चढला. मिड ऑफ आणि मिड ऑनच्या मधे हा चेंडू होता. त्यामुळे बाजूला असलेल्या शुबमन गिल आणि गुरनूर ब्रार यांनी झेल पकडण्यासाठी धाव घेतली. पण हा झेल घेताना दोघांनी एकमेकांना कॉल दिला नाही. त्यामुळे झेल पकडताच दोघांची टक्कर झाली. ब्रारला टक्कर होताच शुबमन गिल खाली पडला. पण सुदैवाने झेल पकडला गेला आणि शुबमन गिलला काहीच दुखापत झाली नाही. खरं तर असा झेल पकडताना दोन्ही खेळाडूंना कॉल देणं महत्त्वाचं असते. पण त्यांनी तसं केलं नाही.

THE BIG COLLISION

Shubman Gill and Gurnoor Brar collided together while taking catch of Jos Buttler.#ShubmanGill #GurnoorBrar #JosButtler pic.twitter.com/xhegNTA4T5

— NIRAJ MALHOTRA (@nirajmalhotra) July 14, 2026

टी20 मालिकेत भारताला 4-0 ने मात खावी लागली होती. त्यामुळे भारतासाठी वनडे मालिका खूपच महत्त्वाची आहे. या मालिकेतील पहिल्याच सामन्यात विजय मिळून 1-0 ने आघाडी घेण्याचं आव्हान टीम इंडियासमोर असेल. तसं पाहिलं तर 259 धावांचं आव्हान गाठण्यास सोपं आहे. पण त्यासाठी भारताला आश्वासक भागीदारीची गरज आहे. आता भारतीय फलंदाज या सामन्यात कशी कामगिरी करतात याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे.





Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • भाऊ आम्हाला माफ कर रे, कुणालच्या मावस बहिणीने अखेर मन मोकळं केलं, सगळं सांगून टाकलं!
  • MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
  • जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
  • आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच
  • नेपाळमध्ये प्रलय… दुसरीकडे चीनचं अख्खं शहर बुडालं, विध्वंसाचा धडकी भरवणारा व्हिडिओ पहाच

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in