
राजकुमारी पद्मजा यांनी या अमेरिकेतील बोस्टन येथील घरात भारतीय संस्कृती आणि मेवाडचा राजेशाही वारसा जीवंत ठेवला आहे. भारतीय कलाकृतींनी हे आलिशान घर सजवण्यात आले असून घरासमोर प्रशस्त लॉन, सौदर्याने नेटलेले रुम्स आणि एक शाही बाथटबने सजलेल्या या घराची झलक पाहूनच तुमचे मन प्रसन्न होईल.
मेवाडच्या राजकुमारीचा या प्रशस्त घराचा दरवाजा एका साध्या पायऱ्यांच्या हॉलमध्ये उघडतो. जो पुढे जाऊन एका आधुनिक लिव्हींग रुमकडे जातो. या लिव्हींग रुमला रंग-बिरंगी कुशन आणि थ्रो, एक सुंदर टेबल आणि एका पियानो सेटअप सह सजवण्यात आले आहे.त्यामुळे ही जागा अत्यंत उर्जादायी आणि पाहुण्याचे स्वागत करण्यास परफेक्ट बनते.
घराच्या प्रवेशद्वाराच्या हॉलमध्ये एक विशाल कलाकृती लावण्यात आली आहे. तसेच राजकुमारीचा एक शानदार फोटोही लावण्यात आला आहे. त्यामुळे या घराला एक पर्सनल टच मिळतो.
मेवाड वारशाने इंटेरिअर प्रेरित
घराचे डिझाईनचा एक मोठा भाग भारतीय संस्कृतीशी संबंधित कलाकृतींनी प्रेरित झाला आहे. आपल्या मेवाड वारशाचा सन्मान करण्यासाठी राजकुमारी पद्मजा हीने जाणीवपूर्वक या इंटेरिअरची निवड केली आहे. घराचे डायनिंग रुम खुपच सुंदर आहे. येथील भिंतींना डार्क निळ्या रंगाची आहे. आणि त्यांच्यावर एक मोठी कलाकृती लावलेली आहे.
बेडरूम आणि शाही बाथटब
घराच्या बेडरुमला ‘मिनिमलिस्ट’ अप्रोचसोबत डिझाईन केले आहे. यात क्लासिक क्वीन-साईज बेड, आरामदायक बसायची जागा, एक फायरप्लेस आणि लँपचा समावेश आहे. प्रत्येक बेडरुमसोबत एक विशाल बाथरुम दिलेले आहे. ज्यात एक चमकदार भिंती समोर एक मोठे आणि भव्य बाथटब ठेवलेले आहे. जे येथील शाही स्नान कसे असेल याची साक्ष देते. बाथरुमच्या संपूर्ण भागाला मुख्य रुपाने पांढऱ्या आणि चमकदार रंगाने सजवले आहेत.
घरात एक कव्हर्ड आऊटडोर सीटिंग एरिया देखील आहे, जो थेट एका विशाल बगीच्यात उघडतो. ही जागा कुटुंब आणि मित्रांसोबत पार्टी करण्यासाठी एक मनोरंजनासाठी एक चांगल्या स्पेसचे काम करते. सायंकाळच्या थंड वातावरणाचा आनंद घेण्यासाठी येथे एक आरामदायक फायरप्लेस देखील तयार केलेले आहे.
१५०० वर्षे वारशाचे संरक्षण
राजकुमारी पद्मजा कुमारी परमार हीचे कुटुंब हयात असलेले जगातील शाही कुटुंब ‘हाऊस ऑफ मेवाड’शी संबंधित आहे. याचा इतिहास १,५०० वर्षे जुना आहे. आज राजकुमारी पद्मजा साता समुद्रापार राहूनही या आपल्या या सांस्कृतित वारसा आणि ऐतिहासिक वारशाला सांभाळीत असून त्याला जगाससमोर आणण्याचा प्रयत्न करत आहे.
राजकुमारी पद्मजा कुमारी परमार हीचे घराणे ‘मेवाड राजघराण्या’ शी संबंधित आहे, जे जगातील सर्वात जुन्या अस्तित्वात असलेल्या राजघराण्यांपैकी एक असून, त्याचा इतिहास १,५०० वर्षे जुना आहे.
Leave a Reply