• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Video | ममता बॅनर्जींचा पारा चढला, कार्यकर्त्याला चक्क कानशीलात लगावली, थेट…

July 8, 2026 by admin Leave a Comment


पश्चिम बंगालच्या राजकारणात आधीच मोठ्या उलथापालथी घडत आहेत. अशात तृणमूल काँग्रेसच्या नेत्या आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी स्वतःच्या पक्षातील एका कार्यकर्त्याला कानशीलात लगावल्याचं दिसत आहे.

कोलकात्यात तृणमूल काँग्रेसच्या विद्यार्थी आणि युवा संघटनेच्या रॅलीदरम्यान काही ठिकाणी गोंधळ आणि धक्काबुक्की झाल्याची माहिती समोर आली. या घटनेत पक्षाचे अनेक नेते आणि कार्यकर्ते जखमी झाले होते. त्यानंतर जखमींना रुग्णालयात पाठवण्यासाठी ममता बॅनर्जी स्वतः कोलकात्यातील कालीघाट येथील निवासस्थानाबाहेर उपस्थित होत्या.

त्या कार्यकर्त्यांना रस्ता मोकळा करण्याच्या सूचना देत होत्या, जेणेकरून वाहने सहजपणे जाऊ शकतील. याच दरम्यान त्यांच्या मागे उभा असलेला एक कार्यकर्ता सुरक्षा कवच तयार करण्याचा प्रयत्न करत होता. त्यावेळी ममता बॅनर्जी अचानक नाराज झाल्या आणि त्यांनी संबंधित कार्यकर्त्याला कानशीलात लागावलं आहे. या प्रकरणावर अद्याप पक्षाकडून अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • कृष्णामाईच्या पात्रात हळदी-कुंकू बदकांचा मुक्त विहार, मनमोहक दृश्याने वेधले सांगलीकराचं लक्ष…
  • भारतीय ऑटो कंपोनेंट इंडस्ट्रीचा धमाका; वित्त वर्ष २०२६ मध्ये ओलांडला तब्बल ७.६ लाख कोटींचा टप्पा!
  • भारतात लवकरच लाँच होणार 4 दमदार प्लग-इन हायब्रिड SUVs; जबरदस्त रेंज आणि मायलेजसह बाजारात स्पर्धा वाढणार!
  • एकनाथ शिंदेंच्या दालनातच राष्ट्रावादी शरद पवार गटाच्या आमदारांची बैठक, रोहित पवार अनुपस्थित तर…नेमकं काय घडलं?
  • फक्त 14 जुलैची वाट पाहा, या 3 राशींच्या आयुष्यात होणार चमत्कारिक बदल; काय काय घडणार?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in