• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Video | मंत्री धर्मेंद्र प्रधान थेट अमित शहांच्या भेटीला; दिल्लीत राजकीय हालचाली वाढल्या!

July 20, 2026 by admin Leave a Comment


दिल्लीमध्ये संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होताच जंतरमंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. कॉकरोच जनता पार्टी (CJP) ने संसदेवर मोर्चा काढण्याची घोषणा केली होती. मात्र, दिल्ली पोलिसांनी आंदोलकांना जंतरमंतरपासून सुमारे 1 किलोमीटर अंतरावर असलेल्या केरळ भवनपर्यंतच मोर्चा काढण्याची परवानगी दिली. यामुळे आंदोलक आणि पोलिसांमध्ये वाद निर्माण झाला.

वाद वाढल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी शीघ्र कृती दलाच्या जवानांना पाचारण करण्यात आले. आंदोलकांना रोखण्याच्या प्रयत्नात पोलिसांनी लाठीमार केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. सुरक्षेच्या दृष्टीने जंतरमंतर आणि आसपासच्या भागात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

या घडामोडी सुरू असतानाच केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान हे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीसाठी रवाना झाले. धर्मेंद्र प्रधान अमित शाह यांच्या भेटीसाठी पोहोचल्याची माहिती समोर आली आहे. या भेटीत नेमकी कोणत्या विषयावर चर्चा होणार, याबाबत अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र, आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर या भेटीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • एकीकडे मनोज जरांगेंचं उपोषण दुसरीकडे ओबीसींचा महाएल्गार मोर्चा, मुबईत मोठं घडणार?
  • हृता दुर्गुळेचा नवीन लुक चर्चेत, दोन वेण्या अन् मोठे कान, लवकरच या चित्रपटातून येणार प्रेक्षकांच्या भेटीला
  • ज्या लोकांना लक्ष वेधून घेण्याची गरज…, फोटो पोस्ट करत असं काय बोलून गेली काजोल?
  • टेन्शन… टेन्शन… टेन्शन… भारतालाही नेपाळ सारखा जलप्रलयाचा धोका? पश्चिम बंगाल डेंजर झोनमध्ये?
  • मोठी बातमी! अशोक खरातला जामीन मिळणार का? कोर्टातील सुनावणीत नेमकं काय घडलं?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in