• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Video : ‘गोळ्या घालणाऱ्यांना आजही नीट झोप येत नाही…’, CJP च्या आंदोलनानंतर हेमंत ढोमेची चर्चेत

July 27, 2026 by admin Leave a Comment


Video : ‘एक गांधी मारला तरी हजारो गांधी जन्म घेतात…’, असं म्हणत अभिनेता आणि दिग्दर्शक हेमंत ढोमे याने अहिंसेच्या मार्गाने लढणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक कविता सादर केली आहे. सांगायचं झालं तर, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी सीजेपीने आंदोलन पुकारलं होतं. दिल्लीत सुरु झालेल्या या आंदोलनाला देशव्यापी स्वरुप प्राप्त झाल्यानंतर केंद्रीय मंत्र्याला राजीनामा द्यावाच लागला. आंदोलना दरम्यान अनेक सेलिब्रिटींनी देखील विद्यार्थ्यांचं समर्थन केलं. हेमंत ढोमे याने देखील आंदोलनाला पाठिंबा दिला. आता त्यांच्या आंदोलनाला यश मिळाल्यानंतर हेमंत याने एक कविता सादर केली आहे. इन्स्टाग्राम अभिनेत्याने कविता म्हणताना व्हिडीओ पोस्ट केला आहे.

हेमंत ढोमे याची कविता…

गोळ्या घालणाऱ्यांना आजही नीट झोप येत नाही…
१९४८ ला घातलेल्या गोळ्यांन आता ७८ वर्ष पूर्ण होतील!
पण, तरीही तो विचार काही केल्या मरत नाही’

‘तो आजही सक्याच्या मार्गाने चालतो आहे
अहिंसेच्या वाटेवर जिंकतो आहे
एक गांधी मरला तरी हजारो गांधी जन्म घेतात’
कारण त्या गोळ्यांपेक्षा बहुधा सत्याचा श्वास अधिक भेदक होता’

‘इतिहासाच्या पानावर एकत वाक्य कोरलं गेलंय
काळाच्या न्यायालयात हिंसेचा पराभव होतोच
नावं बदलतात, चेहरे बदलतात, पुन्हा गोळ्या घालण्याचा प्रयत्न करतात
पुन्हा लाठ्या – काठ्या चालवतात’

‘पण गांधी पुन्हा जन्म घेतो
एकत्र येतो, लढतो, पुन्हा सत्याला जिंकलतो!
आणि ७८ वर्ष उलटून गेली तरी
गोळ्या झाडणाऱ्यांना आजही नीट झोप येत नाही…’

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Hemant Dhome | हेमंत ढोमे (@hemantdhome21)

 

हेमंत ढोमे याने सादर केलेली ही कविता सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओ पोस्ट करत हेमंत याने कॅप्शनमध्ये ‘सत्यमेव जयते!’ असं लिहिलं आहे. तर व्हिडीओच्या शेवटी हेमंत याने महात्मा गांधी यांचा एक फोटो लावला असून त्यावर ‘हा देश गांधीबाबाचा होता… आहे… आणि कायम राहणार!’ असं लिहिलं आहे.

 

 

 





Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • आश्रमशाळेतील 35 विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात हलवलं, पालघर पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी, अचानक काय घडलं?
  • भारताच्या राफेल आणि स्कॉर्पीन करारामुळे फ्रान्स चमकला! अमेरिका-रशियाला मागे टाकत बनला जगातील सर्वात मोठा शस्त्र विक्रेता
  • अमेरिकन क्लाइंटकडून डॉलरमध्ये पगार? जाणून घ्या कराचे नियम, ITR आणि GST चे संपूर्ण गणित
  • मोठी बातमी! MPSC कडून घेण्यात आलेली महत्त्वाची परीक्षा रद्द, पेपरफुटीच्या आरोपानंतर निर्णय
  • डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडवणारी बातमी! या देशाने अमेरिकन उत्पादनांवर लादला 20 अब्ज डॉलरचा टॅरिफ

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in