
Malaika Arora : बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) नेहमी चर्चेत असते. तिचा फिटनेस, तिची स्टाईल, तिचा फॅशन सेन्स यामुळे तिच्याबद्दल सतत चर्चा होत असते. सोशल मीडियावरही तिचे बरेच व्हिडीओ समोर येत असतात. काही महिन्यांपूर्वीच मलायकाने एक आलिशान कार विकत घेतली, ज्याची पूजा करतानाचा तिचा व्हिडीओ समोर आला होता. मात्र तेव्हा तिने घातलेले कपडे आणि पायात बूट घालूनच केलेली पूजा यामुळे तिला बरंच ट्रोल करण्यात आलं होतं. नेटीजन्सनी तिच्यावर खूप टीकाही केली होती. आता मलायका हिचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे.
लाल रंगाचा बॉडीशेपर, निळी जीन्स अशा पेहेरावात मलायका दिसली आहे. अर्धे केस मागे बांधलेले, हातात घड्याळ, आणि गळ्यात सोनेरी जाडजूड चेन, असा तिचा अंदाज असलेला हा व्हिडीओ असून चालत चालत ती तिच्या व्हॅनकडे जाताना स्पॉट झाली. पापाराझींनी तिला थांबवून, हाय करत तिचे फोटो क्लिक केले, व्हिडीओही कॅमेऱ्यात कैद केले. मलायकाचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला असून त्यावर बऱ्याच कमेंट्स येत आहेत. मात्र या लूकमुळे ती पुन्हा नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आली आहे.
कुत्र्याची चेन कोणी घालतं का ?
या व्हिडीओवर विविध कमेंट्स आल्या असून अनेकांनी मलायकाचा लूक, तिचा फिटनेस याचं कौतुक केलं आहे. वयाच्या पन्नाशीनंतरही तिचा फिटनेस पाहून अनेक नेटकरी अवाक् झालेत. मात्र काहींनी तिला ट्रोलही केलंय. तिच्या गळ्यात असलेली गोल्डन चेन काहींना रुचली नसून, कुत्र्याची चेन कोणी घालतं का ? असा सवाल एका नेटकऱ्याने करत मलायकावर टीका केली आहे. एकंदरच तिचा हा नवा लूक बराच चर्चेत आहे.
View this post on Instagram
52 व्या वर्षीही मलायका फिट
अभिनेत्री मलायका अरोरा फिटनेससाठी गेल्या अनेक वर्षांपासून कठोर रूटीन फॉलो करते. 52 व्या वर्षीही ती बॉलिवूडच्या सर्वात फिट अभिनेत्रींपैकी मानली जाते. मलायका अनेकदा तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिचं वर्कआऊट, फिटनेस रूटीन आणि प्रोग्रेसचे फोटो तसेच व्हिडीओही पोस्ट करत असते. तिच्या चाहत्यांच्या त्यावर भरभरून लाईक्स आणि कमेंट्स येत असतात.
Leave a Reply