• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

वर्षा बंगल्यावर घडामोडी वाढल्या, महत्त्वाचा नेता फडणवीसांच्या भेटीला, महायुतीत आणखी एक पक्ष सामील होणार?

August 25, 2026 by admin Leave a Comment


Mahayuti Alliance : राज्याच्या राजकारणात कधी काय होईल हे सांगता येत नाही. गेल्या काही दिवसांपूर्वी शरद पवार यांचा पक्ष एनडीएत सहभागी होऊ शकतो, अशी चर्चा रंगली होती. पडद्यामागे तशा घडामोडीही वाढल्या होत्या. राजकीय वर्तुळात या चर्चेला जास्तच हवा मिळाल्यानंतर शरद पवार यांच्या पक्षाच्या नेत्यांनी समोर येत आम्ही विरोधातच असू, असं स्पष्टीकरण दिलं. विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील समोर येत आता महायुतीत कोणताही नवा पक्ष येणार नाही, असं सांगून टाकलं होतं. दरम्यान, आता ही चर्चा मागे पडलेली असतानाच वर्षा बंगल्यावर घडामोडी वाढल्या आहेत. महत्त्वाचा नेता फडणवीस यांच्या भेटीला पोहोचला आहे. आता शरद पवार यांची राष्ट्रवादी नव्हे तर आरपीआय (खरात गट) पक्ष महायुतीत सामील होण्याची शक्यता आहे.

वर्षावर नेमकं काय घडतंय?

मिळालेल्या माहितीनुसार आरपीआय (खरात गट)चे सचिन खरात वर्षा निवासस्थानी दाखल झाले आहेत. सध्या त्यांच्या पक्षाचा राज्यात एकही खासदार नाही किंवा आमदारही नाही. परंतु आंबेडकरी विचारांचे नेते म्हणून खरात यांना ओळखले जाते. सचिन खरात सोबत आले तर महायुतीला भविष्यात दलित, बहुजनांची मतं मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे असताना आता सचिन खरात हे वर्षा निवासस्थानी दाखल झाले आहेत. त्यामुळे या भेटीचा सध्या सगळीकडे चर्चा सुरू आहे. याआधी खरात गटाने महायुतीला पाठिंबा दिला होता. आता पुन्हा एकदा खरात गट महायुतीला पाठिंबा देण्याची शक्यता आहे.

महायुतीसाठी दलित मतं किती गरजेची?

दरम्यान, महायुतीसाठी दलित, बहुजनांची मतं खूप गरजेची आहेत. हिंदुत्त्वाच्या नावाखाली महायुतीतील शिंदे गट आणि भाजपा हे एकत्र आलेले आहेत. विकासाच्या मुद्द्यावरून नंतर अजित पवार यांची राष्ट्रवादीही त्यांच्यात सामील झाली. परंतु आम्ही सर्वसमावेशक आहोत, आम्हाला समजातील तळागाळातील लोकांसाठी काम करायचे आहे, आमचे सरकार हे दलितांच्या हिताचे आहे, हा संदेश देण्यासाठी महायुतीमध्ये एखादा दलित चेहरा असणे गरजेचे आहे. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले हेदेखील महायुतीमध्ये सामील आहेत. असे असताना खरात गटाने महायुतीला पाठिंबा दिला तर भविष्यात त्याचे काय परिणाम होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

 



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • अवघ्या 1 लाखात घरी आणा मारुती फ्रॉन्क्स! 5 सर्वात स्वस्त व्हेरिएंट्सचे लोन, डाऊन पेमेंट आणि EMI डिटेल्स एकाच ठिकाणी
  • ज्येष्ठ दिग्दर्शक कुकू कोहली यांचं निधन, ‘फूल और कांटे’तून अजय देवगणला केलं लाँच
  • अचानक रशियात उतरलं अमेरिकेचं लष्करी विमान, संपूर्ण युरोपमध्ये खळबळ; नेमकं काय घडलं?
  • तीन वर्षांपासून तसंच घडतंय, रवींद्र जडेजा चुका आणि गिलला बसतोय फटका! तब्बल 22 वेळा फसला
  • FD पेक्षा जास्त परतावा, RBI ची ही योजना मालामाल करणार, हमीसह भविष्य सुरक्षित होणार

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in