
ज्येष्ठ दिग्दर्शक कुकू कोहली ( Kuku Kohli) यांचं मंगळवारी मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात निधन झालं. ते 77 वर्षांचे होते. ‘फूल और कांटे’ या चित्रपटातून अभिनेता अजय देवगण याला हिंदी चित्रपटसृष्टीत लॉन्च करण्याचे श्रेय कुकू कोहली यांना जातं. कुकू कोहली यांचं मूळ नाव संदेश कोहली असं होतं. गेल्या अनेक दशांकापासून ते हिंदी चित्रपटसृष्टीत कार्यरत होते. त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त होत आहे.
कुकू कोहली यांचे मित्र आणि दिग्दर्शक- निर्माचे अशोक पंडीत यांनी त्यांच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला. ‘ त्यांना कोणताही आजार नव्हता. अचानक आलेल्या तीव्र हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. ते पूर्णपणे निरोगी आणि तंदुरुस्त होते,’ असं अशोक पंडीत यांनी नमूद केलं. कुकू कोहली हे इंडियन फिल्म अँड टेलिव्हिजन डायरेक्टर्स असोसिएशनचे (IFTDA) सरचिटणीसही होते.
कुकू कोहली यांच्या पश्चात त्यांची पत्नी आणि ज्येष्ठ अभिनेत्री अरुणा इराणी आहेत. कोहली यांना पहिली पत्नी रीटा कोहली यांच्यापासून पूजा आणि करिश्मा ही दोन मुलं आहेत.
फूल और कांटेला मिळालं मोठं यश
दिग्दर्शक म्हणून कुकू कोहली यांचा पहिला चित्रपट होता ‘फूल और कांटे’. 1991 साली साली आलेल्या हा चित्रपट व्यावसायिकदृष्ट्या मोठा यशस्वी ठरला. या चित्रपटातून अभिनेता अजय देवगण याने हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. त्याच्याशिवाय या चित्रपटात अभिनेत्री मधू, अमरीश पुरी, अरुणा इराणी आणि जगदीप यांच्याही प्रमुख भूमिका होत्या.
यानंतर त्याच वर्षी कुकू कोहली यांनी ‘कोहराम’ हा चित्रपट दिग्दर्शित केला. 1994 साली प्रदर्शिक झालेल्या‘सुहाग’मध्ये त्यांनी पुन्हा अजय देवगण सोबत काम केलं. या चित्रपटात अक्षय कुमार, करिश्मा कपूर आणि नगमा यांच्याही भूमिका होत्या. ‘सुहाग’ हिट ठरला आणि अजय देवगण व अक्षय कुमार यांची पडद्यावरील जोडी पहिल्यांदा याच चित्रपटातून प्रेक्षकांसमोर आली.
त्याव्यतिरिक्त त्यांनी हकीकत (1995), जुल्मी (1999), अनाडी नं .1 (1999) and ये दिल आशिकाना (2002) हे चित्रपटही दिग्दर्शित केले. तर ‘वो तेरा नाम था’ हा त्यांचा दिग्दर्शक म्हणून शेवटचा चित्रपट होता. हा चित्रपट 2004 साली मध्ये प्रदर्शित झाला. कुकू कोहली यांच्या निधनाने हिंदी चित्रपटसृष्टीतील एका अनुभवी दिग्दर्शकाचा प्रवास संपला.
Leave a Reply