
जर तुम्ही युरिन स्टोनने त्रस्त असाल तर ही पान फुटीची पाने मुत्राशय आणि किडनीत अडकलेले खडे लघवीच्या वाटे बाहेर काढते. त्यामुळे आयुर्वेदात यास पाषाण भेद म्हटले जाते.
जर तुम्ही बद्धकोष्ठता किंवा पोटाच्या अन्य विकाराने त्रस्त असाल तर पानफुटीची पाने खाल्ल्यास पोटातील विषाक्त पदार्थ बाहेर टाकून पोट शुद्ध करते.
पान फुटीच्या पानांचा रसाचे सेवन करणे देखील चांगले फायदेमंद असते. जर तुम्हाला मुळव्याध झाला असेल तरी देखील पानफुटीचा रसाचा यावर फायदा होतो.
पान फुटीच्या पानांचा लेप बनवून खाजेच्या जागी, रॅशेस किंवा जखमेच्या जागी लावल्याने खाजेपासून आराम मिळतो.
पान फुटीच्या पानांना उकळून याचा काढा प्यायल्याने वेजाईन इन्फेक्शन पासून दिलासा मिळतो.




Leave a Reply