• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

NIA ची जुन्नरसह पाच ठिकाणी झाडाझडती, हाती लागला महत्त्वाचा पुरावा? तपासात आढळलं काय? दहशतवादी…

August 25, 2026 by admin Leave a Comment


राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) गुजरातमधील सायबर दहशतवाद प्रकरणाच्या सुरू असलेल्या तपासाच्या अनुषंगाने ५ राज्यांमधील ५ ठिकाणी झडती घेतली. पुणे जिल्ह्यातील जुन्नर (महाराष्ट्र), नडियाद (खेडा, गुजरात), रामगुंडम (करीमनगर, तेलंगणा), गोपालगंज (बिहार) आणि दिल्ली येथे ही कारवाई करण्यात आली. राष्ट्रीय तपास यंत्रणा ही भारताची केंद्रीय दहशतविरोधी आणि तपास संस्था आहे. देशातील काही शहरातून दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या आरोपींचा तपास करण्यात येत आहे.

एनआयएकडून सिमकार्ड जप्त

या कारवाई अंतर्गत पुणे जिल्ह्याच्या जुन्नर शहरातील माई मोहल्ला या वस्तीमधील एका संशयिताची चौकशी करण्यात आली असून या चौकशीत नेमके काय निष्पन्न झाले याची माहिती उपलब्ध होऊ शकलेली नसली तरी संशयित व्यक्तीचे सिमकार्ड मात्र जप्त करण्यात आले असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. मात्र त्यास NIA चा अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. NIA ने दिलेल्या प्रसिद्धी निवेदनानुसार – हे प्रकरण RC-01/2025/NIA/AMD (सायबर दहशतवाद गुजरात प्रकरण) या गुन्ह्याशी संबंधित असून, २५ जून २०२५ रोजी त्याची नोंद करण्यात आली होती.

सायबर हल्ल्याचा उद्देश काय?

या प्रकरणातील आरोपींनी ऑपरेशन सिंदूरच्या काळात भारत सरकारच्या विविध संस्थांच्या ५४ संकेतस्थळांवर अत्याधुनिक DDoS हल्ले करण्याचा प्रयत्न केला होता. या हल्ल्यांमध्ये महत्त्वाच्या संगणकीय संसाधनांना आणि Critical Information Infrastructure (CII) ला लक्ष्य करण्यात आले होते. राष्ट्रीय सार्वभौमत्व, सुरक्षा आणि एकात्मतेला बाधा पोहोचवणे तसेच नागरिकांमध्ये भीती निर्माण करणे हा या हल्ल्यांचा उद्देश असल्याचे तपासात समोर आले आहे. या प्रकरणात आतापर्यंत दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाची सुरुवातीला गुजरात ATS कडून नोंद करण्यात आली होती.

तपासादरम्यान तांत्रिक विश्लेषणाच्या माध्यमातून आरोपींना DDoS हल्ले करण्यासाठी तयारी आणि कौशल्यवृद्धीसाठी मदत करणाऱ्या संशयितांची ओळख पटवण्यात आली. सक्षम न्यायालयाकडून झडतीचे वॉरंट मिळाल्यानंतर संबंधित संशयितांच्या ठिकाणी झडती घेण्यात आली.

कारवाईत काय काय जप्त?

या कारवाईदरम्यान हॅकिंगशी संबंधित आक्षेपार्ह माहिती असलेली विविध डिजिटल उपकरणे आणि कागदपत्रे जप्त करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या आरोपींशी असलेल्या संबंधांबाबत संशयितांची चौकशी करण्यात आली. कारवाईत ३ लॅपटॉप, ५ मोबाईल फोन तसेच पेन ड्राइव्हसह इतर डिजिटल उपकरणे जप्त करण्यात आली. मात्र जप्त करण्यात आलेली उपकरणे नक्की कोणत्या ठिकाणाहून जप्त करण्यात आली याबाबत अधिकृत माहिती उपलब्ध होऊ शकलेली नाही. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • फक्त 3.50 लाखांपासून किंमत! 26 किमी मायलेज देणाऱ्या देशातील ‘8’ सर्वात स्वस्त गाड्या; बघा फीचर्स
  • 9000mAh क्षमतेची मोठी बॅटरी असलेला हा वनप्लस स्मार्टफोन मोठ्या सवलतीत उपलब्ध, जाणून घ्या ऑफर
  • Kriti Sanon : कृती सेनला राहुल गांधींचा पाठिंबा, ट्रोल करणाऱ्यांना थेट सुनावलं, म्हणाले महिलांनी काय परिधान करावं…
  • धक्कादायक! ‘या’ तीन औषधांमुळे निर्माण होऊ शकतो कॅन्सरचा धोका, जागतिक आरोग्य संघटनेने दिला गंभीर इशारा
  • गुगल पिक्सल 11 सिरीज ‘या’ आठवड्यात भारतात होणार लाँच, जाणून घ्या वैशिष्ट्ये आणि किंमत

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in