• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

91 मिनिटांत फुल थ्रिल अन् जबरदस्त ट्विस्ट, श्वास रोखून धरणारी कथा; सत्य घटनेवर आधारित सिनेमा ओटीटीवर ट्रेंडिंग

August 25, 2026 by admin Leave a Comment


ओटीटी प्लॅटफॉर्मवर सध्या क्राइम आणि थ्रिलर सिनेमांची चांगलीच चर्चा आहे. अशातच नेटफ्लिक्सवर स्ट्रीम होणारा 91 मिनिटांचा मेक्सिकन क्राइम-अॅक्शन थ्रिलर प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाची कथा काल्पनिक नसून कुख्यात ड्रग लॉर्ड जोआकिन 'एल चापो' गुझमन याच्या 2016 मधील पुनर्अटकेच्या सत्य घटनेपासून प्रेरित आहे.

ओटीटी प्लॅटफॉर्मवर सध्या क्राइम आणि थ्रिलर सिनेमांची चांगलीच चर्चा आहे. अशातच नेटफ्लिक्सवर स्ट्रीम होणारा 91 मिनिटांचा मेक्सिकन क्राइम-अॅक्शन थ्रिलर प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाची कथा काल्पनिक नसून कुख्यात ड्रग लॉर्ड जोआकिन 'एल चापो' गुझमन याच्या 2016 मधील पुनर्अटकेच्या सत्य घटनेपासून प्रेरित आहे.

चित्रपटाच्या कथेच्या केंद्रस्थानी आहेत दोन मेक्सिकन फेडरल पोलीस अधिकारी- आर्टुरो कार्मोना आणि हेक्टर रोसाले. त्यांच्या नेहमीच्या ड्युटीच्या शेवटच्या काही तासांमध्ये एक साधी ट्रॅफिक तपासणी त्यांच्या आयुष्याला पूर्णपणे बदलून टाकते.

चित्रपटाच्या कथेच्या केंद्रस्थानी आहेत दोन मेक्सिकन फेडरल पोलीस अधिकारी- आर्टुरो कार्मोना आणि हेक्टर रोसाले. त्यांच्या नेहमीच्या ड्युटीच्या शेवटच्या काही तासांमध्ये एक साधी ट्रॅफिक तपासणी त्यांच्या आयुष्याला पूर्णपणे बदलून टाकते.

हे दोन्ही अधिकारी एका संशयास्पद आणि चोरीच्या नंबर प्लेट असलेल्या गाडीला थांबवतात. मात्र गाडीमध्ये कोण आहे याची त्यांना सुरुवातीला कल्पनाच नसते. तपास करताना त्यांच्या लक्षात येतं की समोर बसलेला व्यक्ती म्हणजे मेक्सिकोतील सर्वांत कुख्यात ड्रग माफियांपैकी एक एल चापो (El Chapo) आहे.

हे दोन्ही अधिकारी एका संशयास्पद आणि चोरीच्या नंबर प्लेट असलेल्या गाडीला थांबवतात. मात्र गाडीमध्ये कोण आहे, याची त्यांना सुरुवातीला कल्पनाच नसते. तपास करताना त्यांच्या लक्षात येतं की समोर बसलेला व्यक्ती म्हणजे मेक्सिकोतील सर्वांत कुख्यात ड्रग माफियांपैकी एक एल चापो (El Chapo) आहे.

यानंतर सुरू होतो जीवघेणा संघर्ष. एका बाजूला कायद्याचं पालन करण्याची जबाबदारी तर दुसऱ्या बाजूला अत्यंत शक्तिशाली कार्टेलची भीती- या कात्रीत हे दोन पोलीस अधिकारी अडकतात. 'फेसिंग एल चापो' या चित्रपटाची कथा ऑपरेशन ब्लॅक स्वॅन या मोहिमेशी संबंधित आहे.

यानंतर सुरू होतो जीवघेणा संघर्ष. एका बाजूला कायद्याचं पालन करण्याची जबाबदारी, तर दुसऱ्या बाजूला अत्यंत शक्तिशाली कार्टेलची भीती- या कात्रीत हे दोन पोलीस अधिकारी अडकतात. 'फेसिंग एल चापो' या चित्रपटाची कथा ऑपरेशन ब्लॅक स्वॅन या मोहिमेशी संबंधित आहे.

8 जानेवारी 2016 रोजी मेक्सिकोच्या सिनाओला प्रांतातील लॉस मोचीस इथं एल चापोला पुन्हा अटक करण्यात आली होती. त्याआधी तो 2015 मध्ये मेक्सिकोच्या तुरुंगातून एका बोगद्याद्वारे पळून गेला होता. सिनेमाच्या कथेत अटकेनंतरचा हा प्रसंग अत्यंत महत्त्वाचा ठरतो. जर तुम्हाला Narcos Sicario किंवा सत्य घटनांवर आधारित क्राइम-थ्रिलर पहायला आवडत असतील तर 'फेसिंग एल चापो' हा सध्या नेटफ्लिक्सवरील चर्चेत असलेला पर्याय ठरू शकतो.

8 जानेवारी 2016 रोजी मेक्सिकोच्या सिनाओला प्रांतातील लॉस मोचीस इथं एल चापोला पुन्हा अटक करण्यात आली होती. त्याआधी तो 2015 मध्ये मेक्सिकोच्या तुरुंगातून एका बोगद्याद्वारे पळून गेला होता. सिनेमाच्या कथेत अटकेनंतरचा हा प्रसंग अत्यंत महत्त्वाचा ठरतो. जर तुम्हाला Narcos, Sicario किंवा सत्य घटनांवर आधारित क्राइम-थ्रिलर पहायला आवडत असतील, तर 'फेसिंग एल चापो' हा सध्या नेटफ्लिक्सवरील चर्चेत असलेला पर्याय ठरू शकतो.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • अवघ्या 1 लाखात घरी आणा मारुती फ्रॉन्क्स! 5 सर्वात स्वस्त व्हेरिएंट्सचे लोन, डाऊन पेमेंट आणि EMI डिटेल्स एकाच ठिकाणी
  • ज्येष्ठ दिग्दर्शक कुकू कोहली यांचं निधन, ‘फूल और कांटे’तून अजय देवगणला केलं लाँच
  • अचानक रशियात उतरलं अमेरिकेचं लष्करी विमान, संपूर्ण युरोपमध्ये खळबळ; नेमकं काय घडलं?
  • तीन वर्षांपासून तसंच घडतंय, रवींद्र जडेजा चुका आणि गिलला बसतोय फटका! तब्बल 22 वेळा फसला
  • FD पेक्षा जास्त परतावा, RBI ची ही योजना मालामाल करणार, हमीसह भविष्य सुरक्षित होणार

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in