• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Venezuela Earthquake : जमीन थरथरली, इमारती कोसळल्या; रस्त्यावर लोकांची धावपळ, भूकंपाचे ५ भयंकर व्हिडिओ पाहून हादरा बसेल

June 25, 2026 by admin Leave a Comment


व्हेनेझुएलाच्या उत्तर-मध्य भागात झालेल्या भूकंपाने संपूर्ण देशाला हादरा बसला आहे. अवघ्या ४० सेकंदात भूकंपाचे दोन धक्के जाणवले. आधी 7.1 तीव्रतेचा पहिला धक्का जाणवला, त्यानंतर ७.५ तीव्रतेचा दुसरा शक्तिशाली भूकंप झाला. या भूकंपाचे केंद्र युमारेजवळ आढळले. देशाच्या उत्तर मध्य भागात झालेल्या भूकंपामुळे राजधानी काराकाससहित अनेक शहरांचं नुकसान झालं आहे.

सोशल मीडियावर शक्तिशाली भूकंपाचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असल्याचे पाहायला मिळत आहेत. एक बहुमजली इमारत देखील पत्त्यासारखी कोसळली. इमारत कोसळल्यानंतर अनेक नागरिकांची धावाधाव झाली. अनेक लोक जीव वाचवण्यासाठी सैरावैरा धावताना व्हिडिओमध्ये दिसत आहे. तर काही जण पाळीव प्राण्यांना घेऊन धावताना व्हिडिओमध्ये दिसत आहेत. एका व्हिडिओमध्ये रस्त्यावर सर्वत्र ढिगारा पडलेला दिसत आहे. भूकंपाच्या धक्क्याने इमारत कोसळल्याने लोखंडी सळी, क्रॉक्रिंटचे तुकडे रस्त्यावर विखुरले आहेत. भूकंप झाल्यानंतर तातडीने पोलीस पोलीस आणि बचाव पथकाचे जवान घटनास्थळी पोहोचले.

इमारतीच्या ढिगाऱ्यामुळे रस्त्यावर सर्वत्र धूळ पसरली आहे. तर काही ठिकाणी जखमी लोकांना सुरक्षित ठिकाणी नेले जात आहेत. इमारतीचे अनेक भाग रस्त्यावर कोसळल्याने रस्ते बंद झाले आहेत. भूकंपामुळे कोसळलेल्या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचं काम पोलीस, बचाव पथकाचे जवान, स्थानिक लोकांनी सुरू केलं आहे. मोठ्या प्रमाणात लोक हे इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. बचाव पथकाच्या जवानांनी सर्च ऑपरेशन सुरू करत लोकांची मदत करण्यास सुरुवात केली आहे.

भूंकापाचा हादरा केवळ व्हेनुझुएला या देशाला बसला नाही, तर कोलंबियाची राजधानी बोगाटा शहराला देखील हादरे बसले आहेत. ला ग्वायरा, व्हालेन्सिया आणि इतर शहरातील इमारत, हॉटेल आणि सरकारी कार्यालयांचं प्रचंड नुकसान झालं आहे. अनेक ठिकाणी वीज आणि इंटरनेट सेवा खंडीत झाली आहे.

स्थानिक प्रशासनाने आणीबाणी जाहीर केली आहे. भूकंपाच्या शक्यतेने स्थानिक लोकांना मोकळ्या जमा होण्याचं आवाहन केलं आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे. या भूकंपामुळे आतापर्यंत १० हजार लोकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. तसेच या घटनेतील मृत व्यक्ती आणि जखमींचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • वर्षा बंगल्यावर घडामोडी वाढल्या, महत्त्वाचा नेता फडणवीसांच्या भेटीला, महायुतीत आणखी एक पक्ष सामील होणार?
  • तरुण वयातच सांधेदुखीचा त्रास? ‘या’ 5 सवयींमुळे तुमचे पाय होताहेत वेळेपूर्वी म्हातारे
  • एकमेव गाव, जिथे मुलं जन्माला येताच या गायकाचे नाव त्याच्या कानात ऐकवले जाते, कोण आहे तो गायक?
  • Tata Motors चा ग्राहकांना झटका! बजेट कारपासून EV पर्यंत सर्वच गाड्यांचे दर वाढणार, जाणून घ्या नवीन किंमती
  • 91 मिनिटांत फुल थ्रिल अन् जबरदस्त ट्विस्ट, श्वास रोखून धरणारी कथा; सत्य घटनेवर आधारित सिनेमा ओटीटीवर ट्रेंडिंग

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in