• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Vastushastra : आर्थिक समस्यांनी त्रस्त आहात? हातात पैसा टिकत नाही? मग दर शनिवारी करा हा सोपा उपाय

May 22, 2026 by admin Leave a Comment


अनेकांसोबत असं घडतं की ते प्रचंड पैसा कमवतात, पंरतु कधीही त्यांच्या हातात पैसा टिकत नाही. घरात आलेला पैसा कोणत्या न कोणत्या कारणामुळे लगेच खर्च होतो. तिजोरी रिकामी होते, अनावश्यक खर्चात वाढ होते. माणूस कायम आर्थिक संकटात सापडतो. हे असं का होतं? याचा कधी तुम्ही विचार केला आहे का? तर याचं उत्तर तुम्ही तुमचं आर्थिक नियोजन व्यवस्थित न केल्यामुळे देखील हे घडू शकतं. परंतु वास्तुशास्त्रानुसार ज्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये पितृदोष असतो, त्याच्या घरात देखील कधीही पैसा टिकत नाही. अशा माणसाला कायमच पैशांची चणचण भासते. तसेच एखाद्या व्यक्तीला जर शनीची साडेसाती सुरू असेल तर त्याच्या आयुष्यात देखील अशा समस्या येऊ शकतात, त्यासाठी वास्तुशास्त्रात काही सोपे उपाय सांगण्यात आले आहेत. या उपायांमुळे तुम्हाला पितृदोषाचा त्रास होणार नाही, तसेच शनी महाराज देखील तुमच्यावर प्रसन्न होतील. चला तर मग जाणून घेऊयात वास्तुशास्त्रात नेमकं काय सांगण्यात आलं आहे, त्याबद्दल.

दर शनिवारी करा हा सोपा उपाय – वास्तुशास्त्रानुसार ज्या व्यक्तींना पितृदोषाचा त्रास असतो, किंवा शनिची साडेसाती असते, अशा व्यक्तीने दर शनिवारी सकाळी अंघोळ केल्यानंतर पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावला पाहिजे, तसेच पिंपळाच्या झाडाला 11 प्रदिक्षिणा घालाव्यात या उपायामुळे जर तुमच्या कुंडलीमध्ये पितृदोष असेल तर तो दूर होतो. तसेच या दिवशी गरजू लोकांना आवश्यक त्या गोष्टींचं दान करावं, यामुळे तुमचे पूर्वज तुमच्यावर प्रसन्न होतात आणि पितृदोष दूर होतो.

शनी दोष दूर करण्यासाठी काय करावं? जर तुम्हाला शनी दोष असेल तर तो दूर करण्यासाठी दर शनिवारी सकाळी अंघोळ केल्यानंतर शनी मंदिरात जावे, शनी महाराजांचं दर्शन घ्यावं. शनी महाराजांना तेल अर्पण करावं, मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा, तसेच या दिवशी काळे तीळ दान करावेत, गरजू लोकांना दान करावं यामुळे शनी महाराज प्रसन्न होतात, त्यांची कृपादृष्टी सदैव तुमच्यावर राहते, तुमच्या सर्व प्रकारच्या समस्या दूर होतात असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे. एवढंच नाही जर तुम्हाला कायमच आर्थिक समस्या येत असतील तर तुम्ही तुमच्या घराच्या उत्तर दिशेच्या भिंतीवर धनाची देवता कुबेर यांचा फोटो देखील लावू शकतात, त्यामुळे तुमच्या आयुष्यातील आर्थिक अडचणी दूर होतील.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)



Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • अमराठी रिक्षा चालकांना दणका बसणारच, कारवाई कशी होणार? मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली A टू Z माहिती दिली
  • कांदिवली लिंक रोडवर मराठी सक्तीच्या विरोधात रिक्षा चालकांचे आंदोलन, वाहतूक ठप्प
  • उद्धव ठाकरे अन्यायग्रस्त राजकीय नेते वाटतात, कारण…, असीम सरोदेंचं विधान चर्चेत
  • बालकांचा होरपळून मृत्यू… ज्यांची चूक त्यांना सोडणार नाही; चंद्रशेखर बावनकुळेंचा इशारा
  • एका गोष्टीची लाज… सरकारचं शिष्टमंडळ भेटायला येण्यापूर्वीच मनोज जरांगे काय म्हणाले?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in