• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

अमराठी रिक्षा चालकांना दणका बसणारच, कारवाई कशी होणार? मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली A टू Z माहिती दिली

August 24, 2026 by admin Leave a Comment


राज्यात अमराठी रिक्षा चालकांवर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. अमराठी शिकण्याची संधी देऊनही मराठी न शिकलेल्यांवर कारवाई होणार आहे. सरकारच्या निर्णयाने अमराठी रिक्षाचालक अस्वस्थ झाले आहेत. काही अमराठी रिक्षाचालकांनी कांदिवलीत रास्ता रोको केला. एका अमराठी रिक्षाचालकाने थेट मराठी रिक्षा चालकाला मारहाण केल्याचे समोर आलं आहे. अमराठी चालकांवरील कारवाईच्या मुद्दयांवरून वातावरण तापलं असताना परिवरहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी संजय निरुपम यांच्यासोबत पत्रकार परिषद घेतली. अमराठी रिक्षा चालकांना दणका बसणारच आहे. आता कारवाई कशी करण्यात येईल, याविषयी माहिती प्रताप सरनाईक यांनी दिली.

मंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटलं की, ‘महायुतीचं सरकार रोजगार निर्मिती करणारे सरकार आहे. राज्यात येऊन धंदा करा. परंतु मराठी अस्मितेचा आदर करा. तुमचं स्वागत आहे. कोणावरही बेकायदेशीर कारवाई होणार नाही. माझं आवाहन आहे की, बेकायदेशीररित्या रिक्षा चालकांवर कोणतीही कारवाई करता कामा नये. एक महिन्यांची मुदत द्यावी. एका महिन्यात शिकले नाहीत. तर त्यांचं तीन महिन्यांसाठी लायसन्स निलंबित करा. परंतु शिकण्याची संधी द्यावी. तरीही शिकले नाही. तरी त्यांना कायद्याच्या कक्षेत लायसन्स किंवा बॅच निलंबित करावं लागेल. संजय निरुपम यांचे आभार मानतो. शंशाक राव यांचाही कॉल आला होता. त्यांनाही माझं आवाहन आहे. त्यांनीही आम्हाला प्रतिसाद दिला. त्यांनीही त्यांचे पदाधिकारी मोहिमेत सामील करून घेतले. सर्वांचे आभार मानतो. परंतु काही जण जाणीवपूर्वक संभ्रम करत आहेत. तुम्ही नेते मंडळी आहेत. संभ्रम दूर करण्याचं तुमचं काम आहे. तुमचेही मनापासून स्वागत करतो’.

शेअरिंगवर रिक्षा चालवणारे चालक काही 4 प्रवासी बसवतात, या प्रश्नावर मंत्री सरनाईक म्हणाले, ‘आता मुद्दा फक्त मराठीचा आहे. तो मुद्दा घेऊन पुढे चाललो आहे. वेगवेगळे विषय आहेत. बऱ्याच रिक्षा चालकांच्या विरोधात बऱ्याच तक्रारी आहेत. काही जण जवळचे भाडे घेत नाहीत. जाणीवपूर्वक लांबून प्रवास करतात. काही जण अरेरावीची भाषा करतात. कुठेही गाडी पार्क करतात. अशा अनेक तक्रारी आहेत. आजचा विषय…मराठी अमस्मितेसाठी आहे. संजय निरुपम यांनी थेट बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम केलं आहे. त्यांना मराठी अस्मितेची अधिक जाण आहे. त्यांचं स्वागत करतो. प्रत्येकाला संधी देऊ. कोणीही बेकायदेशीररित्या मुजोरी करत असेल. मराठी भाषा बोलणार नाही. तर त्यांची मुजोरी मोडून काढू’.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • भाजपला धक्का, स्टार अभिनेत्याने सोडली साथ; आता नव्या पक्षात एन्ट्री करणार
  • शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज… प्रतिक्षा संपली… कर्जमाफीची तिसरी यादी कधी येणार? मोठी अपडेट समोर
  • CM Vijay : LPG सिलेंडरबाबत विजय यांचा सर्वात मोठा निर्णय; जे कुठल्या राज्याला जमलं नाही ते त्यांनी करुन दाखवलं
  • भावासमोर असे कपडे कोण घालतं…, कृती सेनॉनच्या रक्षाबंधच्या जाहिरातीवर गदारोळ, व्हिडीओ व्हायरल
  • Chanakya Niti : पाहुण्यांच्या घरी जात असाल तर या गोष्टी लक्षात ठेवा, चाणक्य यांनी दिला मोलाचा सल्ला

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in