• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Vastu Tips : पर्समध्ये कधीच ठेवू नका या गोष्टी, अन्यथा आयुष्यभर जवळ राहणार नाही पैसा!

July 19, 2026 by admin Leave a Comment


Purse And Vastu Tips : अनेकदा एखादी व्यक्ती रोज काम करते. महिनाभर काम करून पगार मिळतो. पण नंतरच्या दोन ते तीन दिवस तुमच्या खिशात काहीच राहात नाही. कितीही मेहनत घेतली तरीही पैसे लगेच संपतात. वास्तूशास्त्रानुसार यामागे अनेक कारणं असू शकतात. यातील सर्वात महत्त्वाचं कारण हे तुमची पर्स किंवा वॉलेट होय. तुम्ही वॉलेटमध्ये काय ठेवता, कोणत्या गोष्टी ठेवता यावरून तुमच्याजवळ पैसे राहणार की नाही, हे ठरते. तुम्हीदेखील तुमच्या पर्समध्ये या वस्तू ठेवत असाल तर त्या लगेच पर्समधून काढून फेकून द्या..

तुम्हाला ही सवय असेल तर…

तुम्ही तुमच्या पर्समध्ये फाटलेल्या नोटा किंवा तुटलेले सिक्के ठेवत असाल तर वास्तूशास्त्रानुसार नकारात्मक उर्जा निर्माण होते. यामुळे तुमच्याकडे येणारे धन थांबते. तुम्हाला ही सवय असेल तर लगेच ही सवय मोडा. तुमच्या पर्समध्ये फाटलेल्या नोटा असतील तर त्या पर्समधून लगेच फेकून द्या.

मृत व्यक्तीचा फोटो काढून टाका

अनेकांना पर्समध्ये घरातील मृत व्यक्ती, देवी-देवतांचे फोटो ठेवण्याची सवय असते. आपलया प्रिय व्यक्तीची आठवण म्हणून अनेकजण घरातील मृत व्यक्तीचा फोटो ठेवतात. वास्तूशास्त्रानुसार पर्समध्ये मृत व्यक्तीचा फोटो, देवी-देवतांचे फोटो ठेवणे अशुभ मानले जाते. ही चूक केल्याने कर्जाचा डोंगर वाढतो.

धनप्राप्तीसाठी पर्समध्ये काय ठेवायला हवं?

वास्तूशास्त्रानुसार धनप्राप्तीसाठी तुम्ही पर्समध्ये काही वस्तू ठेवू शकता. तुम्ही पर्समध्ये लक्ष्मी मातेचा फोटो किंवा कुबेर यंत्र ठेवत असाल तर ते शुभ मानले जाते. तुमच्या मनातील एखादी अपूर्ण इच्छा कागदावर लिहून तो कागद पर्समध्ये ठेवल्यास तुमची इच्छा पूर्ण होऊ शकते, असं वास्तूशास्त्रात सांगितलेले आहे. आठवड्यात एकदा पर्सची साफसफाई जरू करावी. तुमची पर्स जेवढी स्वच्छ असेल तेवढेच तुमच्याकडे धन येण्याचे प्रमाण वाढेल.

Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • भारत बांगलादेशच्या संबंधांवर थेट परिणाम, पुन्हा बांगलादेशने तेच केले, पाकिस्तानच्या नादाला लागून..
  • BCCI Rule: रोहित-विराटला खटकलं अन् बीसीसीआयने नियमच बदलला, 10 संघांना तातडीने आदेश दिला
  • Pratap Sarnaik : मंत्री प्रताप सरनाईक-नरेंद्र मेहता वाद पेटला; थेट राजीनाम्यावर प्रकरण पोहोचलं, कोण काय म्हणालं?
  • प्रचंड रोमँटिक गाणं, 100 वेळा ऐकूनही भरत नाही मन, 36 वर्षांपासून प्रेक्षकांचं प्रचंड आवडीचं
  • Mumbai News : केळी विकायला चाललेल्या मुंबईतील सुनीता मोरे मृत्यू प्रकरणाला नवीन वळण, फजुल रहमानने तिला दुकानात नेलं आणि..

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in