• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Vastu Shastra : नेहमी सोबत ठेवा या चार गोष्टी, आयुष्यात कधीच तुमच्या प्रगतीला ब्रेक लागणार नाही

April 17, 2026 by admin Leave a Comment


वास्तुशास्त्र हे दोन मुख्य गोष्टींवर कार्य करतं, सकारात्मक ऊर्जा आणि नकारात्मक ऊर्जा. वास्तुशास्त्रानुसार जेव्हा तुमच्या भोवती नकारात्मक ऊर्जा निर्माण होते, तेव्हा त्याचा तुम्हाला प्रचंड त्रास होऊ शकतो. तुमचं मन अस्वस्थ होतं, सारखी चिडचिड होते. अचानक घरात आर्थिक समस्या सुरू होतात. काहीही कारण नसताना कुटुंबातील सदस्यांसोबत वाद होतात ही काही नकारात्मक ऊर्जेची लक्षणं आहेत. या उलट जेव्हा तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा असते, तेव्हा याच्या उलट परिणाम तुम्हाला अनुभवायला मिळू शकतात. जसं की घराची भरभराट होते. तुम्हालाही प्रगतीच्या नवीन संबंध उपलब्ध होतात. व्यावसाय किंवा नोकरीमध्ये अकस्मात मोठा लाभ होतो. वास्तुशास्त्रानुसार जर घरातील नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव कमी करायाचा असेल तर ऊर्जेचं संतुलन साधलं गेलं पाहिजे. वास्तुशास्त्रात अशा काही गोष्टी सांगण्यात आल्या आहेत, ज्यामुळे नकारात्मक शक्ती तुमच्यापासून कोसो दूर राहते, चला तर मग या गोष्टींबद्दल जाणून घेऊयात.

तांब्याचे नाणे – तुम्ही तुमच्या पर्स किंवा पाकिटात एक तांब्याचं नाणं ठेवू शकतात. याचे अनेक चमत्कारीक फायदे वास्तुशास्त्रात सांगण्यात आले आहेत. जर तुम्ही तुमच्या पाकिटात तांब्याचं नाणं ठेवलं तर त्यामुळे तुमच्या सर्व प्रकारच्या आर्थिक अडचणी दूर होतात. तुम्हाला आर्थिक स्थैर्याची प्राप्ती होते. तसंच तुमचं मन शांत राहतं, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे.

चंदनाचा तुकडा – जर तुम्हाला तुमचामध्ये आत्मविश्वासाची कमी आहे, असं जाणवत असेल तर त्यासाठी वास्तुशास्त्रात एक सोपा उपाय सांगण्यात आलं आहे. एक छोटासा चंदनाचा तुकडा तुमच्या पाकिटात किंवा खिशात ठेवा, यामुळे तुमच्या आत्मविश्वासात वाढ होते.

केशर – जर तुम्हाला प्रसिद्ध हवी असेल, तुम्हालाही असं वाटत असेल की आपलीही ओळख व्हावी, आपण प्रसिद्ध व्हावं. लोकांनी आपल्याला मान सन्मान द्यावा तर यासाठी तुम्ही जेव्हा एखाद्या कामासाठी घराबाहेर पडता तेव्हा तुमच्या खिशामध्ये केशरचे काही दाणे ठेवू शकतात. यामुळे तुम्हाला प्रसिद्धी मिळेल. तुमच्या कामातील सर्व अडथळे दूर होतील.

विलायची – जर तुम्ही एखाद्या मोठ्या संधीच्या शोधात असाल किंवा काही महत्त्वाचं काम करायला जाणार असाल किंवा नोकरीसाठी मुलाखतीला जाणार असाल, अशा महत्त्वाच्या वेळी खिशात दोन ते तीन विलायची ठेवाव्यात. यामुळे कामातील सर्व प्रकारचे अडथळे दूर होतात, तुम्हाला त्या कामात यश मिळतं, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • काँग्रेसला याची किंमत चुकवावी लागेल, महिला आरक्षण विधेयक नामंजूर झाल्याने रणसंग्राम, कोण काय म्हणाले ?
  • GK : जगातील कोणत्या देशात सर्वात जास्त पदवीधर? आकडेवारी वाचून हैराण व्हाल
  • BAN vs NZ : बांगलादेशची घरात पराभवाने सुरुवात, न्यूझीलंडची विजयी सलामी, 26 धावांनी जिंकला सामना
  • इराणची एक घोषणा अन् भारतासाठी 3 आनंदाच्या बातम्या, गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या लोकांना होणार फायदा
  • Strait of Hormuz : डोनाल्ड ट्रम्प यांचा धक्कादायक निर्णय, स्ट्रेट ऑफ होर्मूजबाबत सर्वात मोठी बातमी, जगभरात पुन्हा मोठी खळबळ

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in