• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Strait of Hormuz : डोनाल्ड ट्रम्प यांचा धक्कादायक निर्णय, स्ट्रेट ऑफ होर्मूजबाबत सर्वात मोठी बातमी, जगभरात पुन्हा मोठी खळबळ

April 17, 2026 by admin Leave a Comment


अमेरिका आणि इराणमध्ये युद्धविराम झाला आहे. त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीने इस्त्रायल आणि लेबनॉनमध्ये देखील युद्धविराम घडून आला. इस्त्रायल आणि लेबनॉनमध्ये युद्धविराम होताच इराणकडून स्ट्रेट ऑफ होर्मूज पुन्हा एकदा जगासाठी ओपन करण्याची घोषणा करण्यात आली. इराणच्या या घोषणेमुळे संपूर्ण जगाला मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र त्यानंतर आता अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या नव्या घोषणेमुळे जगाची चिंता वाढली आहे. इराणकडून स्ट्रेट ऑफ होर्मूज सुरू करण्यास हिरवा झेंडा दाखवण्यात आला आहे. मात्र दुसरीकडे आता अमेरिकेनं स्ट्रेट ऑफ होर्मूज बाबत मोठा निर्णय घेतला आहे. याबाबत बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. जोपर्यंत इराणसोबत पूर्णपणे युद्धविराम होत नाही, तोपर्यंत आम्ही स्ट्रेट ऑफ होर्मूजमधील ब्लाकेड हटवणार नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची यांनी आज सोशल मीडियावर पोस्ट करत स्ट्रीट ऑफ होर्मूज जगासाठी पुन्हा एकदा सुरू झाला असल्याची घोषणा केली, त्यानंतर लगेचच डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील एक पोस्ट केली आहे, त्यामध्ये त्यांनी स्पष्ट केलं आहे की, स्ट्रेट ऑफ होर्मूज संपूर्ण जगासाठी आता ओपन झाला आहे, मात्र जोपर्यंत इराणसोबत पूर्ण युद्धविराम होत नाही, तोपर्यंत अमेरिकेनं स्ट्रेट ऑफ होर्मूजमध्ये लावलेला ब्लाकेड आम्ही हटवणार नाही. अमेरिकेचा ब्लाकेड तोपर्यंत तिथेच राहील जोपर्यंत इराणसोबतची आमची देवाण -घेवाण पूर्ण होत नाही. मी अशी आशा करतो की ही प्रक्रिया आता लवकरच होईल. अनेक मुद्द्यांवर आमची सहमती झाली आहे.

कच्च्या तेलाच्या दरात घसरण

दरम्यान इराणकडून शुक्रवारी स्ट्रेट ऑफ होर्मूज पुन्हा एकदा जगासाठी ओपन करण्याची घोषणा करण्यात आली आहे. इराणने स्ट्रेट ऑफ होर्मूज सुरू करण्याची घोषणा करताच कच्च्या तेलाच्या बाजारपेठेत मोठा भूकंप आला आहे. कच्च्या तेलाच्या किंमती झपाट्याने घसरल्या आहेत. कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये तब्बल 11 टक्क्यांची घसरण झाली आहे, तर गॅसच्या किंमतीमध्ये 8 टक्क्यांपेक्षा अधिक घसरण झाली आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • गाडीला स्क्रॅच किंवा डेंट लागणार नाही, नवीन ड्रायव्हर्सनी ‘या’ 5 गोष्टींची नक्की काळजी घ्या
  • कधी काळी एकमेकांचे कट्टर दुश्मन होते, आज गळ्यात गळे घालतात हे देश !
  • IPL 2026 Poits Table : गुजरातला सलग तिसऱ्या विजयानंतर तगडा फायदा, पॉइंट्स टेबलमध्ये कितव्या स्थानी झेप?
  • OnePlus Pad 4 दमदार स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्ससह 30 एप्रिल रोजी भारतात होणार लाँच
  • SRH vs CSK Live Streaming : हैदराबाद-चेन्नईमध्ये कडवी झुंज, कोण जिंकणार तिसरा सामना?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in