
अमेरिका आणि जपान – दुसऱ्या जागतिक महायुद्धाच्या काळात अमेरिका आणि जपान एकमेकांचे शत्रू होते. १९४१ मध्ये जपानने पर्ल हार्बरव हल्ला केला. त्यानंतर अमेरिकेने हिरोशिमा आणि नागासकीवर अणू बॉम्ब हल्ला केला. लाखो लोक ठार झाले. हेच दुश्मनीचे कारण होते. मात्र, १९४५ मध्ये एक वेळ अशी आली की जपानने आत्मसमर्पण केले. अमेरिकेने जपानच्या पुनर्निमाणात मदत केली. तेथे लोकशाही मजबूत केली. हळूहळू दोन्ही देश एकमेकांचे सहकारी झाले. आज जे एकमेकांचे मित्र म्हणून जगासमोर उभे आहेत.
फ्रान्स आणि जर्मनी मध्ये अनेक युद्ध झाली. पहिले आणि दुसरे महायुद्ध देखील यांच्यातच झाले. अन्य देश देखील या युद्धात सामील झाले. साल १९५०मध्ये एक वेळ अशी आली की दोन्ही देशांची सहकाऱ्यांची भूमिका घेतली. त्यांनी कोयला आणि इस्पात समुदाय तयार केला. युरोपीय संघात दोघे पुढे एकत्र आले. आज फ्रान्स आणि जर्मनी एकमेकांचे मित्र आहेत.
अमेरिका- व्हिएतनाम – व्हिएतनाम युद्ध १९५५ ते १९७५ पर्यंत चालले. यात लाखो लोक ठार झाले. दोन्ही देशात कट्टर दुश्मनी होती. मात्र, १९९५ मध्ये टर्निंग पॉईंट आला. दोन्ही देशांनी कूटनितीक संबंध प्रस्थापित केले. व्यापार आणि शिक्षण क्षेत्रात सहकार्य वाढले. आज दोन्ही देश आर्थिक भागीदार आहेत.
अमेरिका आणि चीन – १९५०मध्ये चीन आणि अमेरिकेत तणाव होता. कोरिया युद्धात ते एकमेकांच्या समोर होते. दीर्घकाळ कोणताही संपर्क नव्हता. १९७० च्या दशकात अमेरिकेचे अध्यक्ष निक्सन यांनी चीनचा दौरा केला. त्यामुळे संबंध सुधारले. व्यापार आणि संवाद सुरु केला. आज दोन्ही देशात स्पर्धा आहे. परंतू संवाद देखील होतो आहे.
ब्रिटन – आयर्लंड – ब्रिटन आणि आर्यलँड यांच्यात दीर्घकाळ संघर्ष सुरु होता. उत्तर आयर्लंड येथे खूप हिंसा झाली. १९९८ मध्ये यांच्या गुड फ्रायडे एग्रीमेंट झाला. दोन्ही देशात शांतता निर्माण झाली. आज दोन्ही देशात चांगले संबंध आहेत. उत्तर आयर्लंड ब्रिटन सोबत आहे.
रशिया आणि जर्मनी – दुसऱ्या महायुद्धात रशिया आणि जर्मनी एकमेकांच्या समोर उभे होते. एकमेकांचे कट्टर दुश्मन. जर्मनीने रशियावर हल्ला केला होता. युद्धानंतर टर्निंग पॉईंट आला. आर्थिक आणि राजकीय सहकार्य वाढले. खास करुन १९९० नंतर दोन्ही देशात संबंध सुधारले. आज दोन्ही देश सहकारी आहेत.
जपान आणि द. कोरिया – या दोन्ही देशात इतिहासावरुन वाद आहेत. जपानने कोरियावर राज्य केले होते. साल १९६५ मध्ये दोन्ही देशातील संबंध सामान्य झाले. अजूनही काही मुद्यांवर मतभेद आहेत. तरीही दोन्ही देशात सहकार्य वाढत आहे.
अमेरिका- जर्मनी – दुसऱ्या जागतिक महायुद्धात अमेरिका आणि जर्मनीची दुश्मनी होती. १९४५ मध्ये दोन्ही देश एकत्र आले. अमेरिकेने जर्मनीच्या पुनर्निमितीत पुढाकार घेतला. यानंतर नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायजेशन नाटो तयार झाला. आज दोन्ही एकमेकांचे मित्र आहेत. मात्र इराणच्या संघर्षात अमेरिकेला यावेळी युरोपातील जवळपास सर्वच देशांनी त्यांच्या अनुरुप साथ दिलेली नाही. यात जर्मनीचा देखील समावेश आहे.







Leave a Reply