
लोकसभेत सादर झालेले १३१ वे घटना दुरुस्ती विधेयक दोन तृतीयांश बहुमत न मिळाल्याने मंजूर झाले नाही. त्यानंतर सत्ताधारी आणि विरोधी पक्षात जोरदार संघर्ष सुरु झाला आहे. या विधेयकात संसदेतील सध्या ५४३ जागांना वाढवून ८५० जागा करणे आणि मतदार पुनर्रचनेशी जोडण्याची तरतूद होती. ज्यास विरोधी पक्षांनी लोकशाही ढाच्यात बदलाचा प्रयत्न म्हटले. यानंतर संसदेत मतदानाची प्रक्रिया सुरु झाली आणि विधेयक ५४ मतांनी नामंजूर झाले. या प्रकरणात कोण काय म्हणाले हे पाहूयात…
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी विरोधकांवर टीका करताना म्हटले की नारी शक्तीच्या अपमानाची ही बाब येथे थांबणार नाही, दूर-दूरपर्यंत जाणार. विरोधकांना महिलांचा हा आक्रोश न केवळ २०२९ च्या लोकसभा निवडणूकीत,तर प्रत्येक पातळीवर आणि निवडणूकीत आणि प्रत्येक ठिकाणी झेलावा लागणार आहे.
अमित शाह यांचा विरोधकांवर निशाना
अमित शाह यांनी एक्सवर लिहिलंय नारी शक्ती वंदन अधिनियमसाठी आवश्यक घटना दुरुस्ती विधेयकाला काँग्रेस, टीएमसी, डीएमके आणि समाजवादी पार्टीने पारित होऊ दिले नाही. महिलांना ३३ टक्के आरक्षण देणाऱ्या विधेयकाला मंजूरी न देणे, आणि त्याचा आनंद साजरा करणे आणि जयघोष करणे खरोखरच निंदनीय आणि कल्पने पलिकडे आहे. आता देशाच्या महिलांना लोकसभा आणि विधानसभेत ३३ टक्के आरक्षण, जो त्यांचा अधिकार होता, तो आता मिळणार नाही. काँग्रेस आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हे पहिल्यांदा केले नाही. तर वारंवार केले आहे. त्यांचा हाच विचार न महिलांच्या आणि न देशाच्या हिताचा आहे.
याची किंमत चुकवावी लागेल …
काँग्रेस, इंडी आघाडीने ज्याप्रकारे हे आरक्षण विधेयक नामंजूर करण्याचे काम केले आहे. ते देशाच्या जनतेने, नारी शक्तीने पाहिले आहे आणि त्यांचे चेहरेही पाहिले आहे.येणाऱ्या दिवसात याची किंमत यांना चुकवावी लागेल अशी टीका केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी केली आहे. काँग्रेस पार्टी विशेष राहुल गांधी प्रत्येक गोष्टीचा विरोध करतात. हे लोक नारी विकास, नारी वंदन आणि नारी प्रतिनिधीत्वाचा विरोध करतात. देशाची जनता आणि देशाच्या माता- बहिणी यांना माफ करणार नाहीत असे भाजपाचे खासदार रविशंकर प्रसाद यांनी म्हटले आहे.
महिला आरक्षणाचे घटनादुरुस्ती विधेयक आज ज्या प्रकारे फेटाळले गेले आणि काँग्रेस पक्षाने पुन्हा एकदा देशाला विभाजित करण्याचा आपला अजेंडा ठामपणे मांडला, त्यामुळे काँग्रेसचे डावपेच, चारित्र्य आणि चेहरा उघड झाला आहे अशी टीका केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी केली आहे.
देशाच्या निवडणूक ढाच्याला बदलण्याचा प्रयत्न
लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी या विधेयकाला संविधानावरील हल्ला असे म्हणत हा देशाच्या निवडणूक ढाच्याला बदलण्याचा प्रयत्न होता. ज्याला विरोधी पक्षांनी मिळून रोखले आहे. त्यांनी सांगितले की हा थेट महिला आरक्षणाचा मुद्दा नव्हता, तर यास मतदार पुनर्रचना आणि लोकसंख्येशी जोडून राजकीय लाभ मिळवण्याचा प्रयत्न केला जात होता.
महिला आरक्षण नव्हे, मतदार पनुर्रचना बिल नामंजूर
जर सरकार विना मतदार पनुर्रचना आणि जनगणनेच्या अटीच्या ऐवजी थेट महिला आरक्षण बिल घेऊन आली असती तर ते सहज लागू केले असते. हे विधेयक ज्या प्रकारे सरकारने सादर केले, त्या प्रकारे त्याचे मंजूर होणे अशक्य होते अशी टीका काँग्रेस नेता प्रियंका गांधी वाड्रा यांनी केली आहे. त्यांनी महिला आरक्षणाला मतदार पुनर्रचनेशी जोडले, जुन्या जनगणनेशी यास जोडले, ज्यामुळे ते मंजूर झाले नाही. इमरान प्रतापगढी यांनी म्हटले हे महिला आरक्षण बिल नव्हे तर मतदार पुनर्रचना बिल नामंजूर झाले आहे.
Leave a Reply