• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Vastu Shastra : देवपूजा करताना कधीही करू नका या चार चुका, पडू शकतात महागात, कंगाल व्हाल

July 20, 2026 by admin Leave a Comment


हिंदू धर्मामध्ये वास्तुशास्त्राला प्रचंड महत्त्व आहे. वास्तुशास्त्रामध्ये केवळ तुमचं घर कसं असावं? याबद्दलच माहिती सांगण्यात आलेली नाहीये, तर देवपूजा कशी करावी? देवपूजा करताना कोणत्या नियमांचं पालन करावं? तुमच्या घरातील देवघराची रचना कशी असवी? याबद्दल देखील मार्गदर्शन करण्यात आलं आहे. वास्तुशास्त्रानुसार प्रत्येकाची काही न काही इच्छा असते, ती इच्छा पूर्ण व्हावी, घरात सुख शांती यावी तसेच मनाला समाधान लाभावे यासाठी प्रत्येक जण देवपूजा करत असतो. तुमच्या घरातील सर्वात मोठा सकारात्मक ऊर्जेचा स्त्रोत कोणता असेल तर तो म्हणजे तुमचं देवघर. परंतु जेव्हा या ऊर्जेच्या मार्गात अडथळा निर्माण होतो, तेव्हा तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. त्यामुळे घरात वास्तुदोष निर्माण होतो. घरात वास्तुदोष निर्माण झाल्यामुळे तुमच्या आयुष्यात अडचणी येऊ शकतात. जेव्हा तुम्ही देवपूजा करताना नियमांचं पालन करत नाहीत, चुकीच्या पद्धतीने पूजा करतात, तेव्हा या सकारात्मक ऊर्जेच्या मार्गात अडथळा निर्माण होतो, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.

पूजा करताना या चुका टाळा

वास्तुशास्त्रानुसार पूजा झाल्यानंतर कधीही देवाचं स्थान बदलू नये, अनेकांना पूजा झाल्यानंतर देवघरातील कोणते देव आधी कुठे ठेवले होते. हे लक्षात राहत नाही, त्यामुळे अनेकदा देवघरातील देवांचं स्थान बदलत राहतं. मात्र असं होता कामा नये, तुम्ही पूर्वी जिथे जे देव ठेवले होते, तिथेच ते देव ठेवा. जर तुमच्या देवघरातील देवांचं स्थान वारंवार बदल असेल तर त्यामुळे तुमच्या आयुष्यात देखील अस्थिरता येते, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.

संपूर्ण देवपूजा – अनेकांना सवय असते, देवपूजेनंतर अनेकजण देवाला नैवेद्य दाखवणे विसरतात, कधी फूल अर्पण करायला विसरतात. परंतु देवाला आधी जल अर्पण करावं, त्यानंतर पंचामृत स्नान घालावं, पु्न्हा एकदा जल स्नान घालावे देव स्वच्छ कापडाने पुसून घ्यावेत, त्यानंतर वस्त्र अर्पण करावीत. आधी देवाला गंध लावावा, त्यानंतर फूल अर्पण करावं तसेच त्यानंतर नैवेद्य दाखवावा. यालाच संपूर्ण पूजा विधी असं म्हटलं जातं यातील एकही गोष्ट विसरता कामा नये.

एकाच देवघरात दोन सारख्या मूर्ती – वास्तुशास्त्रानुसार एकाच देवघरामध्ये दोन सारख्या मूर्ती किंवा देव नसावेत, उदाहरणार्थ दोन शिवलिंग, किंवा शंख, किंवा दोन रंगनाथ अशा देवांच्या दोन दोन मूर्ती नसाव्यात. देवघरात नेहमी एका देवाची एकच मूर्ती असावी असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.

देवघरामध्ये आणि देवघराच्या संपूर्ण परिसरात नेहमी स्वच्छता असावा, या परिसरात कोणतीही टाकावू वस्तू असू नये, हा संपूर्ण परिसर नेहमी स्वच्छ असावा. त्यामुळे घरात प्रसन्न वातावरण राहतं, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • समय रैना पुन्हा वादात? प्रसिद्ध कॉमेडियन प्रचंड भडकला, थेट व्हिडीओ पोस्ट करून…
  • भाईजानसोबत काम करण्याचं हिरानींचं स्वप्न ? पण एका गोष्टीमुळे रखडलं दोघांचं काम
  • त्या खास प्रयोगासाठी 1 हजार अंडवेअर जमिनीखाली पुरल्या, 2 महिन्यांनी खोदताच शास्त्रज्ञांना बसला प्रचंड धक्का, जमिनीमधून थेट…
  • नेपाळ पुराला जबाबदार असलेला ग्लेशियर कसा काय तुटला ? ग्लोबल वार्मिंग की आणखी काही कारण ?
  • यूपीच्या निवडणुकीमुळे मराठी सक्तीचा निर्णय लांबणीवर, अमित ठाकरेंची फडणवीसांवर टीका!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in