• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Vastu Shastra : झोपेतून उठल्यानंतर लगेचच पाहू नका या तीन वस्तू, दिवस खराब जातो, कामात अडथळे येतात

April 16, 2026 by admin Leave a Comment


वास्तुशास्त्रानुसार तुमच्या भोवती ज्या काही गोष्टी असतात त्याचा सकारात्मक किंवा नकारात्मक प्रभाव हा तुमच्यावर पडत असतो. जेव्हा तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते, तेव्हा तुमच्या आयुष्यात अचानक काही अडचणी येण्यास सुरुवात होतात, जसं की घरात सगळं व्यवस्थित सुरू असताना आणि कोणतंही कारण नसताना पती-पत्नीमध्ये भांडणाला सुरुवात होते. अचानक एखादं मोठं आर्थिक संकट येतं. हे टाळण्यासाठी ऊर्जा संतुलन महत्त्वाचं असतं. नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव कमी करून ऊर्जा संतुलन साधण्यासाठी वास्तुशास्त्रात अनेक उपाय सांगण्यात आले आहेत. वास्तुशास्त्रानुसार अशा काही गोष्टी असतात ज्या गोष्टी तुम्ही झोपेतून उठल्यानंतर लगेचच पाहिल्या तर त्याचा तुमच्यावर नकारात्मक प्रभाव पडतो. तुमच्या कामांमध्ये अडथळे निर्माण होतात. तुमचा दिवस खराब जातो. चला तर मग जाणून घेऊयात या नेमक्या कोणत्या गोष्टी आहेत? आणि वास्तुशास्त्रात नेमकं काय सांगण्यात आलं आहे? त्याबद्दल.

आरसा पाहू नका – अनेक लोकांना झोपेतून उठल्यानंतर आरसा पाहण्याची सवय असते, मात्र वास्तुशास्त्रात याला अशुभ माण्यात आलं आहे. कारण तुम्ही जेव्हा झोपेतून उठता तेव्हा तुमच्या अंगात प्रचंड प्रमाणात नकारात्मक ऊर्जा असते, आणि जेव्हा तुम्ही सकाळी झोपेतून उठल्या-उठल्या आरसा पहाता तेव्हा ती ऊर्जा रिफेक्लेट होते, ज्याचा तुमच्यावर नकारात्मक परिणाम होतो, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे.

पूर्वजांचा फोटो – झोपेतून उठल्यानंतर कधीही लगेच पूर्वजांचा फोटो पाहू नये असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे. यामुळे घरात नकारात्मक शक्तीचा प्रभाव वाढतो, ज्याचा परिणाम हा तुमच्यावर होत असतो, त्यामुळे झोपेतून उठल्यानंतर कधीही पूर्वजांचा फोटो पाहू नये असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे.

बंद घड्याळ – वास्तुशास्त्रामध्ये घड्याळाला गतीचं प्रतिक मानलं जातं. त्यामुळेच घरात कधीही बंद घड्याळ ठेवू नये असा सल्ला वास्तुशास्त्रात देण्यात आला आहे. तसेच सकाळी झोपेतून उठल्यानंतर कधीही बंद घड्याळ पाहू नये, त्यामुळे तुमच्यावर नकारात्मक शक्तीचा प्रभाव पडतो असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)



Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Cheapest Oil India: जगातला कोणता देश भारताला सर्वात स्वस्त क्रुड ऑईल विकतो ?
  • अन् त्याने मला नको तिथे स्पर्श केला, सलमान खानसोबत स्क्रीन…प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला हादरवणारा प्रसंग!
  • रात्री झोपण्यापूर्वी करा या 4 गोष्टी, तुमच्या शरीराला चांगल्या झोपेसोबतच मिळतील आश्चर्यकारक फायदे
  • रोहित-सूर्याच्या डोळ्यादेखत श्रेयस अय्यरची जबरदस्त कामगिरी, एका उडीने सामना फिरवला Video
  • या ठिकाणी चुकूनही काढू नका शब्द, चाणक्य नीतीमधील शांत राहण्याचं गूढ वाचलंत का?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in