
डेझी शाह या अभिनेत्रीला आज संपूर्ण भारत ओळखतो. आपलं सौंदर्य आणि अभिनयाच्या जोरावर आज तिचे बॉलिवुडमध्ये वेगळे स्थान आहे. 2014 साली दिग्गज अभिनेता सलमान खान याच्या जय हो चित्रपटापासून तिने आपल्या करिअरची सुरुवात केली.
आज जरी ती एक प्रसिद्ध अभिनेत्री असली तरीही तिला तिच्या करिअरच्या सुरुवातीला कास्टिंग काऊचचा सामना करावा लागला होता. याबाबत तिने नुकतेच सांगितले आहे. कास्टिंग मिटिंगच्या वेळी तिच्यासोबत हा प्रसंग घडला होता.
तेव्हा डेझी शाहने एका चित्रपट निर्मात्याची भेट घेतली होती. हा निर्माता दाक्षिणेकडील होता. ते मुंबईत आलेले होते. तिथे एका चित्रपटासाठी ते ऑडिशन घेत होते. हे ऑडिशन द्यायला मिदेखील गेले होते. त्याच ठिकाणी माझ्यासोबत विचित्र प्रसंग घडला असं तिने सांगितलं आहे.
ऑडिशनदरम्यान त्या निर्मात्याने डेझी शाहला तिच्या परवानगीविना स्पर्श केला होता. तसेच त्याने तिच्या शरीराला हात लावले होते, अशी आठवण डेझी शाहने सांगितली. मला कोणीही माझ्या शरीराला स्पर्श केलेले आवडत नाही, असेही तिने सांगितले आहे.
दरम्यान, डेझी शाहने तिच्यासोबत घडलेल्या या प्रसंगाबद्दल खुलेपणाने सांगितल्याने आता पुन्हा एकदा बॉलिवुडमधील कास्टिंग काऊचबद्दल बोलले जात आहे. याआधीही अनेक अभिनेत्रींसोबत असे प्रकार घडलेले आहेत.




Leave a Reply