
Cheapest Oil India: इराण यु्द्धानंतर जागतिक तणाव आणि इंधनाच्या किंमतीमध्ये होणाऱ्या चढ-उतारामुळे भारतासाठी कच्च्या तेलाची खरेदी जास्त महत्वाची आहे. पुरवठ्यातील व्यत्यय आणि निर्बंधांमुळे जागतिक व्यापाराचे मार्ग बदलत आहेत. अशात भारत अनेक देशांकडून सक्रीय रुपाने तेल आयात करत आहे. चला तर पाहूयात कोणता देश आहे जो भारताला सर्वात स्वस्त कच्चे तेल विकत आहे.
भारताला सर्वात स्वस्त तेल विक्री करणारा देश
सध्या रशियाच भारताला कच्चे तेल विकणारा सर्वात मोठा आणि स्वस्त पुरवठादार आहे. भारत रशियाकडून सुमारे ९४ डॉलर प्रति बॅरल दराने तेल आयात करत आहे. हा दर इतर पुरवठादारांच्या तुलनेत कमी आहे.भारताच्या एकूण आयातीत रशियाचा वाटा ३१ ते ४१ टक्क्यांच्या दरम्यान राहिला आहे.
मात्र, युक्रेन युद्धाच्यानंतर रशियाने सुरुवातील प्रति बॅरल ३५ डॉलरपर्यंतची मोठी सूटची ऑफर दिली होती. मात्र, भौगोलिक राजकीय दबाव आणि निर्बंधामुळे आता ही सूट घटून केवळ २ ते ३ डॉलर प्रति बॅरल इतकीच राहिली आहे.
व्हेनेझुएला आणि इराण
भारत व्हेनेझुएला आणि इराण सारखे नवीन कमी खर्चाच्या पर्यायांचा शोध घेत आहे. अमेरिकेने जारी केलेल्या निर्बंधातू सुट दिल्यानंतर व्हेनेझुएला एक पूरवठादाराच्या रुपात पुन्हा पुढे येत आहे. याच प्रकारे इराणने देखील सुमारे ७ वर्षांनंतर भारतला तेलाचा पुरवठा पुन्हा सुरु केला आहे.
पारंपरिक पुरवठादार
या सवलतीच्या तेल खरेदी शिवाय भारत अमेरिका, सौदी अरब, इराक आणि संयुक्त अरब अमिरात सारख्या देशांकडूनही तेल आयात सुरुच ठेवली आहे. यात अमेरिका सर्वात महागडा पुरवठादार आहे. सौदी अरब, इराक आणि युएई हे त्यांच्या विश्वासार्हतेमुळे भारताचे प्रमुख पुरवठादार बनले आहेत. मात्र, रशियाच्या तुलनेत या देशांचे दर जास्त आहेत.
लॉजिस्टिक्स आणि वाहतूकीचा खर्च
एकूण तेल आयातीच्या खर्चात तेलाच्या वाहतूक खर्चाचा देखील विचार करावा लागतो. सौदी अरबकडून तेल पोहचण्यासाठी केवळ तीन दिवस पुरतात.त्यामुळे तेल वाहतूकीचा खर्च कमी होतो. त्यामुळे सौदीचे तेल महाग असूनही वाहतूकी खर्च कमी असल्याने परवडते. तर रशियाचे तेल स्वस्त जरी असले तरी त्याला भारतात पोहचायला १५ दिवसही लागू शकतात. तर अमेरिकेकडून येणाऱ्या तेलाला ४५ ते ५० दिवस देखील लागू शकतात.
Leave a Reply