• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Vastu Shastra : घरात हंस किंवा बदकाच्या जोडीचा फोटो का लावावा? जाणून घ्या वास्तुशास्त्र काय सांगतं?

June 25, 2026 by admin Leave a Comment


आपलं घर आनंदी राहावं, घरात सुख, शांती, समृद्धी राहावी, कुटुंबातील सदस्यांमध्ये एकमेकांबद्दल प्रेम असावं, अशी प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते. त्यासाठी आपण वास्तुशास्त्र आणि फेंगशुई मध्ये सांगितलेले विविध उपाय देखील करत असतो. जर तुमच्या घरात नकारात्मक शक्ती वाढली तर तुमच्या आयुष्यात विविध प्रकारच्या समस्या येण्यास सुरुवात होते. तसेच कोणतंही कारण नसताना घरात भांडणाला सुरुवात होते. पती-पत्नीचं पटत नाही. अचानक एखादं मोठं आर्थिक संकट तुमच्यावर येऊ शकतं. यावर वास्तुशास्त्रामध्ये विविध उपाय सांगण्यात आले आहेत. वास्तुशास्त्रानुसार असे काही फोटो असतात, ते जर तुम्ही घरात लावले तर त्यामुळे तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. पती-पत्नीमध्ये भांडणं होत नाहीत, पती-पत्नीमधील गैरसमज दूर होतात, वादविवादाचे प्रसंग निर्माण होत नाहीत. आज आपण बदक किंवा हंस यांच्या जोडीचे फोटो घरात लावण्याचे काय फायदे आहेत? याबद्दल जाणून घेणार आहोत.

वास्तुशास्त्रानुसार घरात बदक किंवा हंस यांच्या जोडीचे फोटो लावणं हे अतिशय शुभ माण्यात आलं आहे. यामुळे घरात नेहमी सकारात्मक ऊर्जा राहते. हंस आणि बंदक यांना प्रेम तसेच नातेसंबंधांचं प्रतिक मानलं जातं. जर तुमच्या घरात वारंवार भांडणं होत असतील, पती-पत्नीचं पटत नसेल, नातेसंबंधांमध्ये दुरावा निर्माण झाला असेल तर अशा स्थितीमध्ये घरात हंस किंवा बदकाच्या जोडीचा फोटो लावावा असा सल्ला वास्तुशास्त्रात देण्यात आला आहे. यामुळे नातेसंबंधांमधील दुरावा नष्ट होतो. घरातील वादविवाद कमी होतात. तसेच घरात सुख, शांती, समृद्धी येते, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे. परंतु हे फोटो घरात लावताना एक गोष्ट लक्षात घ्यावी असे फोटो नेहमी जोडीनेच लावावेत. एकट्या बदकाचा किंवा हंसाचा फोटो लावू नये. तसेच हे फोटो नेहमी पूर्व दिशेला तोंड करून लावावेत.

आर्थिक प्रगतीसाठी – अनेकदा असं होतं की आपण प्रचंड कष्ट करतो, परंतु आपल्या हातात पैसाच टिकत नाही, घराला आर्थिक स्थिरता प्राप्त होत नाही. वारंवार आर्थिक समस्या येतात. कर्ज वाढतं, अशा स्थितीमध्ये घरात हंसाच्या जोडीचा फोटो ठेवावा असा सल्ला वास्तुशास्त्रात देण्यात आला आहे. यामुळे घरातील सर्व आर्थिक समस्या नष्ट होतात.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • ओमराजे निंबाळकर यांना सोशल मीडियावर फटका, तब्बल 35 हजार लोकांनी केले अनफॉलो..
  • Nepal Flood: पत्याच्या बंगल्यासारखी कोसळली घरं, हजारो लोक गेले वाहून, अंगावर काटा येईल असं पुराचं रौद्र रुप
  • डोळ्यांची 85% दृष्टी गेली, तब्येत बिघडली… इम्रान खान यांची तुरुंगात बिकट अवस्था, मुलांनी केला खुलासा
  • आंतरजातीय विवाह करणारे होणार लखपती, सरकारची मोठी घोषणा, मिळणार इतके पैसे
  • MPSC Paper Leak : लव्ह स्टोरीमुळे फुटला MPSC चा पेपर, तपासातून धक्कादायक माहिती समोर

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in