• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Vastu Shastra : घरात ताण तणाव वाढलाय? सतत आर्थिक समस्या येतायेत? मग करा हा सोपा उपाय

June 25, 2026 by admin Leave a Comment


वास्तुशास्त्रानुसार मिठाला लक्ष्मी मातेचं रूप मानलं जातं. त्यामुळेच कधीही संध्याकाळच्या वेळी कोणालाही मीठ देऊ नये, त्यामुळे घरात गरीबी येते असं मानलं जातं. मिठाला सकारात्मक ऊर्जेचा सर्वात मोठा स्त्रोत देखील मानलं जातं. वास्तुशास्त्रामध्ये मिठाचे असे काही उपाय सांगितले आहेत, ज्यांच्या मदतीने तुम्ही तुमच्या घरातील नकरात्मक ऊर्जा कमी करू शकता. ऊर्जा संतुलन निर्माण होण्यास मदत होते. वास्तुशास्त्रात सैंधव मिठाला विशेष महत्त्व आहे. सैंधव मीठ हे केवळ जेवणाची चवच वाढवत नाही, तर या मिठाचा वापर करून आपण आपल्या भोवती असलेली नकारात्मक ऊर्जा देखील कमी करू शकतो. अनेकांच्या आयुष्यात विविध समस्या असतात, जसं की कोणाच्या हातात पैसा टिकत नाही, कोणाच्या घरी सारखी भांडणं होतात, त्यामुळे ताण तणाव वाढतो. अनेकदा तुम्हाला घरात आल्यानंतर अस्वस्थ वाटू लागते. या समस्या समस्या दूर करण्यासाठी वास्तुशास्त्रात सैंधव मिठासंबंधित काही सोपे उपाय सांगण्यात आले आहेत, त्याबद्दलच आज आपण जाणून घेणार आहोत.

राहु -केतूचा प्रभाव कमी करण्यासाठी – राहु, केतू हे छायाग्रह आहे. त्यामुळे जर एखाद्याच्या कुंडलीमध्ये राहु किंवा केतूचा दोष निर्माण झाला असेल तर अशा व्यक्तीच्या आयुष्यात अनेक अडचणी येऊ शकतात. महत्त्वाच्या कामांमध्ये नेहमी अडथळे निर्माण होतात. चिडचिड वाढते, मन अस्वस्थ होतं. त्यामुळे कुंडलीतील राहु, केतूचा प्रभाव टाळण्यासाठी वास्तुशास्त्रात एक सोपा उपाय सांगण्यात आला आहे. वास्तुशास्त्रानुसार सैंधव मिळाचे दोन छोटे भांडे भरून घ्या आणि ते तुमच्या घराच्या वायव्य दिशेला ठेवा, यामुळे तुमच्या घरातील सर्व प्रकारचा वास्तुदोष नष्ट होतो, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे.

आर्थिक समस्या – अनेकदा असं होतं की आपणं प्रचंड कष्ट करतो, परंतु आपल्या हातात पैसाच टिकत नाही. याला कारणीभूत तुमच्या घरात निर्माण झालेली नकारात्मक ऊर्जा देखील असू शकतो. अशावेळी वास्तुशास्त्रात सांगितलेला सैंधव मिठाचा सोपा उपाय करावा. एका काचेच्या भांड्यामध्ये मिठ भरावं आणि ते घराच्या मुख्य दरवाजाजवळ वायव्य दिशेला ठेवावं, यामुळे सर्व दोष नष्ट होईल असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • ओमराजे निंबाळकर यांना सोशल मीडियावर फटका, तब्बल 35 हजार लोकांनी केले अनफॉलो..
  • Nepal Flood: पत्याच्या बंगल्यासारखी कोसळली घरं, हजारो लोक गेले वाहून, अंगावर काटा येईल असं पुराचं रौद्र रुप
  • डोळ्यांची 85% दृष्टी गेली, तब्येत बिघडली… इम्रान खान यांची तुरुंगात बिकट अवस्था, मुलांनी केला खुलासा
  • आंतरजातीय विवाह करणारे होणार लखपती, सरकारची मोठी घोषणा, मिळणार इतके पैसे
  • MPSC Paper Leak : लव्ह स्टोरीमुळे फुटला MPSC चा पेपर, तपासातून धक्कादायक माहिती समोर

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in